Join us

​पाहा; रवीना टंडनच्या ‘मातृ- द मदर’चा अफलातून ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 13:54 IST

अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचे काही पोस्टर्स आपण बघितलीत. आता वेळ आहे, ती या चित्रपटाच्या ट्रेलरची. होय, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचे काही पोस्टर्स आपण बघितलीत. आता वेळ आहे, ती या चित्रपटाच्या ट्रेलरची. होय, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि यात रवीनाने दमदार वापसी केली आहे. अ‍ॅक्शन आणि इमोशनने भरलेले हे ट्रेलर अंगावर शहारे आणणारे आहे. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा मांडली गेली आहे.   मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्यायासाठी झगडणाºया आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. ट्रेलरमधील रवीनाचा अभिनय अफलातून असाच आहे.  ‘मातृ- द मदर’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात एक लढाई दाखवली आहे. निश्चितपणे तब्बल १३ वषार्नंतर वापसी करण्यासाठी रवीनाने अतिशय दमदार स्क्रिप्ट निवडली आहे. ट्रेलर पाहता, ही कथा प्रेक्षकांच्या नक्की काळजाला हात घालेल यात काहीच शंका नाही.  २१ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ही कथा मायकल पैलिकोने लिहिली असून अश्तर सईदने दिग्दर्शित केली आहे. बोनी कपूर यांची निर्मिती असलेला ‘मॉम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. कोणत्याही दोन चित्रपटांच्या नावामध्ये सार्धम्य असल्यास त्या चित्रपटावरून वाद हा होतो. त्यामुळे या चित्रपटाच्या नावाचे मॉम या चित्रपटाच्या नावाशी सार्धम्य असल्याने या चित्रपटाच्या नावाच्या बाबतीत वाद होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण असे काहीही न होता हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘मॉम’या चित्रपटात श्रीदेवी एका आईची भूमिका साकारणार असून आई-मुलीच्या नात्यातील दुराव्याबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे.