Join us  

SEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 5:02 PM

सलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या ...

सलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.

 

सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. 

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.

टॅग्स :सलमान खान