Join us

SEE PICS : बॉलिवूडच्या या दुस-या ‘आलिया’ला तुम्ही ओळखता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 12:43 IST

बॉलिवूडची आलिया भट्ट तुम्हाला ठाऊक आहेच. पण बॉलिवूडमध्ये आणखी एक आलिया आहे, तिला कदाचित तुम्ही ओळखत नसाल. कारण, जान्हवी ...

बॉलिवूडची आलिया भट्ट तुम्हाला ठाऊक आहेच. पण बॉलिवूडमध्ये आणखी एक आलिया आहे, तिला कदाचित तुम्ही ओळखत नसाल. कारण, जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान या सर्वांच्या गर्दीत बॉलिवूडची ही दुसरी आलिया काहीशी मागे पडलीय. ही आलिया कोण? तर आलिया कश्यप. होय, अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. इंडस्ट्रीतील आॅफ बीट दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या अनुरागची लाडकी लेक़आलिया कश्यप बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची कुठलीही चर्चा नाही. कारण आलिया कश्यप सध्या केवळ १६ वर्षांची आहे. अर्थात तिचा अंदाल कुण्या हिरोईनपेक्षा कमी नाही. रिअल लाईफमध्ये आलिया अतिशय स्टाईलिश आणि ग्लॅमरस आहे.आलिया बॉलिवूडमध्ये येणार की नाही, ठाऊक नाही. पण आलिया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. ती कायम आपले बोल्ड व ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.आलियाने अलीकडे एका फॅशन पोर्टलसाठी मॉडलिंग केले होते. सध्या आलिया अमेरिकेत शिक्षण घेत आहे.आलिया ही अनुरागची पहिली पत्नी आरती बजाज हिची मुलगी आहे. अनुरागने २००३ मध्ये आरतीसोबत लग्न केले होते. २००९ मध्ये हे अनुराग व आरती वेगळे झालेत. पण अनुराग आपल्या मुलीच्या खूप जवळ आहे.ALSO READ : ​‘गर्लफ्रेन्ड’ शुभ्रा शेट्टीसोबत इंटिमेट होताना दिसला अनुराग कश्यप!आरतीनंतर अनुराग त्याची असिस्टंट डायरेक्टर सबरीना खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असेही कळले जाते. अर्थात हे नातेही फार काळ चालले नाही. यानंतर अनुरागने २०११ मध्ये अभिनेत्री कल्की कोच्लिनसोबत लग्न केले. मात्र २०१५ मध्ये हे लग्नही तुटले. सध्या अनुराग व शुभ्रा शेट्टी यांच्या नात्याची चर्चा आहे. २३ वर्षांची शुभ्रा व अनुरागचे इंटिमेट होत असतानाचे फोटे मध्यंतरी चांगलेच व्हायरल झाले होते. शुभ्रा ही अनुरागची मुलगी आलिया हिच्यापेक्षा केवळ सहा वर्षांनी मोठी आहे.अर्थात अनुरागचे आलियासोबतचे नाते मात्र यामुळे जराही बदलले नाही.