Join us

SEE PICS : ​आमिर खानच्या नाकातील ‘नोज रिंग’ तुम्ही बघितली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 14:04 IST

आमिर खान ‘पीके’ या चित्रपटात आॅलमोस्ट न्यूड झाला आणि आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी चक्क नाक टोचले.

आमिर खान ‘पीके’ या चित्रपटात आॅलमोस्ट न्यूड झाला आणि आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी चक्क नाक टोचले.  होय, ‘पीके’मध्ये आमिर न्यूड झाला, ‘गजनी’साठी  अंगभर टॅटू गोंदवून घेतले, ‘दंगल’मध्ये दोन पहेलवान मुलींचा बाप बनण्यासाठी कित्येक किलो वजन वाढवत लोकांना अवाक् केले आणि आता यापुढे जात त्याने नाक टोचून घेतले. सुशांत सिंह राजपूतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील आमिरचा अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या फोटोत आमिरने नोज रिंग घातलेली आहे. सध्या आमिर ‘ठग्ज आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात बिझी आहे. पण त्याचा हा लूक याच चित्रपटासाठी आहे की काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधीही आमिर पगडी घातलेल्या अवतारात दिसला होता. तेव्हा त्याचा हा पगडीधारी अवतार ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठीच आहे, असे आपण समजून बसलो होतो. पण प्रत्यक्षात त्याचा तो लूक एका अ‍ॅड कॅम्पेनसाठी होता. आमिर त्याच्या चित्रपटांसाठी जीवतोड मेहनत करतो, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. कदाचित याचमुळे त्याचा चित्रपट येतो तेव्हा, लोक त्यावर तुटून पडतात. आमिरचा हा नवा अवतार ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी असेल तर या चित्रपटावरही लोक तुटून पडणार हे नक्की. तूर्तास प्रयोगशील आमिरच्या नाकातील नोज रिंग कशी वाटली, ते आम्हाला जरूर कळवा. खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यावर प्रतिक्रिया  देऊ शकता. ALSO READ : आमिर खान म्हणतो, नो ‘लो अँगल शॉट!येत्या जूनमध्ये आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे शूटींग सुरु होणार आहे. यात आमिरसोबत मेगास्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.अर्थात आमिरच्या अपोझिट यात कुण्या अभिनेत्रीची वर्णी लागेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत आहे.