Join us

SEE PIC : ‘टायगर जिंदा है’ ची शूटिंग सोडून कॅटरिना कैफ परतली मुंबईत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 19:40 IST

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ एक्स बॉयफ्रेंड सलमान खानसोबत आॅस्ट्रिया येथे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची शूटिंग ...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ एक्स बॉयफ्रेंड सलमान खानसोबत आॅस्ट्रिया येथे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त होती. काही दिवसांपूर्वीच दोघेही मुंबई विमानतळावरून शूटिंगसाठी आॅस्ट्रिया येथे रवाना झाले होते. परंतु कॅटरिना अचानकच ‘टायगर जिंदा है’ आणि सलमान खान यांना सोडून मायदेशी परतली आहे. तिच्यासोबत सलमान परतला नसल्याने तिच्या घरवापसीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जेव्हा कॅटरिना मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. स्पोर्टी ड्रेसमध्ये असलेली कॅटरिना खूपच सुंदर दिसत होती; मात्र सलमानला सोडून ती अचानक का परतली असा प्रश्न उपस्थित केला असता, अद्यापपर्यंत कोणाकडूनही त्याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण दिले गेले नाही. गेल्या १२ मार्च रोजी सलमान आणि कॅटरिना आॅस्ट्रियासाठी रवाना झाले होते; मात्र आता ती एकटीच परतली असून, यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. एक तर तिच्यावाटेचा शूटिंगचा भाग पूर्ण झाला असावा, अन्यथा अचानक असे काही घडले असावे जेणेकरून कॅटरिनाला शूटिंग सोडून मायदेशी परतावे लागले. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिनाला बॅकचा त्रास जाणवत होता. या त्रासातून कॅटरिनाची अद्यापपर्यंत सुटका झालेली नाही. त्यामुळे असेही असू शकते की, कॅटरिना उपचारासाठी परतली असावी. पूर्णत: फिट झाल्यानंतरच ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगचा ती विचार करीत असावी. कारण हा चित्रपट पूर्णत: अ‍ॅक्शनपट असल्याने यामध्ये कॅटरिनालाही काही स्टंट करावे लागणार आहेत. ‘एक था टायगर’ या पहिल्या भागात जबरदस्त अ‍ॅक्शन दाखविण्यात आली आहे.