SEE HOT PIC : सेल्फीमध्ये टॅटू दाखविताना दिसली ‘जग घुमया’ची गायिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 21:07 IST
बॉलिवूड गायिका नेहा भसीन सध्या भलत्याच मुडमध्ये असल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या शुक्रवारी तिने इन्स्टाग्रमावर टॅटू दाखवितानाचे असे काही ...
SEE HOT PIC : सेल्फीमध्ये टॅटू दाखविताना दिसली ‘जग घुमया’ची गायिका!!
बॉलिवूड गायिका नेहा भसीन सध्या भलत्याच मुडमध्ये असल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या शुक्रवारी तिने इन्स्टाग्रमावर टॅटू दाखवितानाचे असे काही सेल्फी शेअर केले जे बघून तिचे फॅन्स नक्कीच सुखावले असतील. या फोटोंमध्ये नेहाच्या शरीरावर चार टॅटू असल्याचे दिसत आहेत. वर्कआउट दरम्यान क्लिक केलेल्या या सेल्फीमध्ये नेहा खूपच कमी कपड्यात असल्याचे बघावयास मिळत आहे. यापूर्वीदेखील नेहाने अशाच प्रकारचे हॉट फोटो शेअर करून धूम उडवून दिली होती. सलमान खान याच्या ‘सुलतान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘जग घुमया...’ हे गीत गाऊन ती प्रसिद्धी झोतात आली. या गाण्यासाठी तिला अवॉर्डही मिळाला आहे. ३४ वर्षीय नेहा लहानपणापासून पॉपस्टार बनण्याची इच्छा ठेवून होती. वयाच्या ९ व्या वर्षी तिने शाळेत आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेत यशही मिळविले होते. जेव्हा तिने ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या सिनेमात ‘धुडकी’ हे गीत गायिले तेव्हा तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. या गाण्यासाठी तिला स्टारडस्टच्या म्युझिकल सेंसेनल आॅफ द इयर या पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले होते, तर गेल्यावर्षी रिलीज झालेल्या सलमान याच्या ‘सुलतान’ या चित्रपटात ‘जग घुमया’ हे गीत गाऊन अक्षरश: धूम उडवून दिली. या गाण्यासाठी तिला स्टारडस्ट आणि फिल्मफेअरचा बेस्ट प्लेबॅक सिंगर हा अवॉर्डही मिळाला. दरम्यान, नेहा तिच्या गायिकीबरोबरच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते. बोल्ड सिंगर म्हणूनही तिच्याकडे बघितले जाते. सोशल मीडियावर तर नेहमीच अशाप्रकारचे फोटो शेअर करून ती धूम उडवून देत असते. नेहाचे या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धूम उडविली आहे.