Join us

​पाहा : दीपिकाचा ‘Guns n girl’ अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:57 IST

दीपिका पादुकोणच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. होय, ‘XXX: The Return of Xander Cage’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

दीपिका पादुकोणच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. होय, ‘XXX: The Return of Xander Cage’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दीपिकाने ‘बिग बॉस’च्या सेटवर सलमान खानसोबत हा ट्रेलर रिलीज केला. यात दीपिका कधी नव्हे ते जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे. यापूर्वी ‘ट्रिपल एक्स’चा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यात दीपिकाला फारसी जागा मिळाली नव्हती. यामुळे भारतातील दीपिकाच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. पण आता या हॉलिवूडपटाच्या इंडियन वर्जनमध्ये पूर्णपणे दीपिकाचा ‘जलवा’ दिसतो आहे.  या संपूर्ण ट्रेलरमध्ये केवळ आणि केवळ दीपिकावर फोकस करण्यात आला आहे. एकंदर काय तर हा ट्रेलर केवळ ‘दीपिका ओरिएंटेड’ आहे.   भारतात प्रथमच एक मेगा हॉलिवूड अ‍ॅक्शनपट कुण्या हॉलिवूड स्टारऐवजी बॉलिवूड कलाकाराच्या नावावर प्रमोट केला जात आहे. दीपिकाच्या स्टारडममुळे हे शक्य झाले आहे. या हॉलिवूडपटात अ‍ॅक्शनस्टार विन डिजेल लीड रोलमध्ये आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.