Join us  

रेखा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, बंगला केला सील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 5:10 PM

अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे.

कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. गेल्याकाही दिवसांत बोनी कपूर यांच्या घरात काम करणारी व्यक्तीला लागण झाली होती.त्यानंतर आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण झालीची माहिती समोर आली होती.यामध्ये त्याचे दोन बॉडीगार्ड आणि स्वयंपाकीचाही समावेश होता.

आता रेखा यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे.  दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारेखा