अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ मधील गाण्यामागचे गुपीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 22:40 IST
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१७ हे साल खरोखरच खास ठरणार असल्याचे दिसतेय. या वर्षी त्याचे चार सिनेमे प्रदर्शित होत ...
अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ मधील गाण्यामागचे गुपीत?
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१७ हे साल खरोखरच खास ठरणार असल्याचे दिसतेय. या वर्षी त्याचे चार सिनेमे प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतील सर्वांत पहिला चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ अनेक कारणांसाठी आतापासूनच चर्चेत आला आहे. अक्षयच्या ‘जॉली एलएलबी २’ मधील एक गाणे त्याची मुलगी नितारा हिच्यापासून प्रेरणा घेऊन तयार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉली एलएलबी २ या चित्रपटात अक्षय कुमार एका वकिलाची भूमिका करीत आहे. नुकतेच ‘जॉली एलएलबी २’च्या प्रमोशनसाठी एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्याची प्रेरणा त्याला त्याच्या मुलीकडून मिळाली असल्याचे सांगण्यात येते. एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस अक्षय आपली मुलगी नितारासोबत खेळत होता. त्यावेळी निताराने तिला नर्सरीत शिकवलेली एक राईम्स गाऊ लागली. ‘ही इज अ जॉली गुड फेलो’ असे या गीताचे बोल होते. हे शब्द काणी पडताच अक्षयने आपल्या आगामची चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा मुखडा वापरता येईल असा अंदाज लावला. यानंतर अक्षयने दिग्दशक सुभाष कपूरशी याबाबत चर्चा केली व हे गाणे फायनल करण्यात आले. अक्षय कुमारने अशा मुखड्यांचा वापर प्रथमच केला असे नाही. यापूर्वी त्याच्या इंटरटेनमेंट या चित्रपटात ‘जॉनी जॉनी यस पापा’ या गाण्याच्या धरतीवर ‘मैने पी नही है’ हे गाणे करण्याचा सल्ला दिग्दर्शकाला दिला होता. इंटरटेनमेंट या चित्रपटातील हे गाणे हिट ठरले होते. आता अक्षय कुमार याने लढविलेली शक्कल किती हिट ठरते हे लवकर कळेल. अक्षय कुमार, हुमा कुरेशी व अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबी २ हा चित्रपट १० फे ब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.