Join us  

या दिग्दर्शकाने 25 वर्षांनंतर मागितली होती बोनी कपूर यांची माफी, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:59 AM

एका माफीनाम्याची गोष्ट...

ठळक मुद्दे‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ लीड रोलमध्ये होते.

 बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा आज वाढदिवस. 13 एप्रिल 1956 रोजी सतीश यांचा जन्म झाला. अभिनेता म्हणून प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर सतीश यांनी दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवले. त्याआधी शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले होते. पुढे सतीश यांनी दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु केली. अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टारर ‘रूप की रानी चोरो का राजा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. पण त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. पुढे 25 वर्षांनंतर या चित्रपटासाठी सतीश यांनी माफी मागितली होती. का? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

१६ एप्रिल १९९३ रोजी ‘रूप की रानी चोरो का राजा’ हा चित्रपट रिलीज झाला होता.  या चित्रपटाचे निर्माता होते बोनी कपूर.बोनी कपूर यांनी मोठ्या विश्वासाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश कौशिक यांच्या खांद्यावर टाकली होती. या चित्रपटावर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. या चित्रपटावा बजेट 10 कोटी रूपये होता. त्याकाळी हा बजेट खूप मोठा होता. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा बजेटही वसूल होऊ शकला नाही. या चित्रपटाचे केवळ 3 कोटी रूपये कमावले. बोनी कपूर यांचे मोठे नुकसान झाले़ इतके की, पुढील दोन वर्षे त्यांनी कुठलाही सिनेमा प्रोड्यूस केला नाही.  चित्रपट आपटला. ना या बडी स्टार कास्ट कामी आली, ना सतीश कौशिक यांचे दिग्दर्शन. याचे शल्य सतीश कौशिक यांच्या मनात कुठेतरी असावे. याचमुळे  या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली त्यादिवशी सतीश यांनी  यांनी आपले मन मोकळे करत, बोनी कपूर यांची माफी मागितली होती.

 काय म्हणाले होते सतीश कौशिक‘२५ वर्षांपूर्वी बोनी कपूर यांनी मला ‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पहिला ब्रेक दिला होता. हा चित्रपट माझ्यासाठी माझ्या मुलासारखा होता. पण हा चित्रपट  दणकून आपटला. श्रीदेवींचे स्मरण करत, यासाठी मी बोनी कपूर यांची माफी मागू इच्छितो,’असे सतीश कौशिक यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर लिहिले होते.

काय होती ‘रूप की रानी चोरो का राजा’ची कथा

‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ लीड रोलमध्ये होते. दोन एकमेकांपासून ताटातूट झालेल्या भावांची कथा यात दाखवण्यात आली होती. पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ जीवाचे रान करतात, असे याचे कथानक होते. श्रीदेवी यात फिमेल लीडमध्ये होत्या.

टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूर