सारा अली खान पहिल्याच चित्रपटात देणार तीन बिकिनी सीन्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 18:22 IST
अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूरबरोबरच सैफची मुलगी सारा अली खानही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...
सारा अली खान पहिल्याच चित्रपटात देणार तीन बिकिनी सीन्स!!
अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूरबरोबरच सैफची मुलगी सारा अली खानही सध्या चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक साराने बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची पूर्ण तयारी केली असून, लवकरच तिच्या अदा प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहेत. निर्माता करण जोहर तिला लॉन्च करणार असून, पहिल्याच चित्रपटात साराचा बोल्ड अॅण्ड बिंधास अंदाज बघावयास मिळणार आहे. सध्या सारा जिथे जाईल तिथे फॅशनेबल आउटफिटमध्ये बघावयास मिळत आहे. सूत्रानुसार करणने सारासोबत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनादेखील साइन केले आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून, चित्रपटात सारा एक नव्हे तर तब्बल तीन बिकिनी सीन्स देताना बघावयास मिळणार आहे. होय, करण त्याच्या चित्रपटात साराला सेक्सी अवतारात दाखवू इच्छितो. चित्रपटात साराची एंट्रीच बिकिनीत होणार आहे. पाण्यातून बाहेर निघताना ती एंट्री करणार आहे. दुसºया दृश्यात ती अभिनेत्याबरोबर बिकिनी घालून लव्ह मेकिंग सीन करताना दिसणार आहे. तर तिसºया सीनमध्ये सारा आणि दिशा दोघीही टू पीसमध्ये आपले जलवे दाखविणार आहेत. सैफने एका मुलाखतीत म्हटले होते की, सारा करण जोहरसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करीत आहे. मुळात करण न्यूकमर लॉन्च करण्यास प्रसिद्ध आहे. त्यामुळे तो काय करतो, याची त्याला चांगली जाणीव असल्याचे सैफने म्हटले होते. करण जोहर त्याच्या पहिल्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या चित्रपटाचा ‘स्टूडेंट आॅफ द इयर-२’ असा सीक्वल बनवित आहे. त्यामुळेच सारा नेहमीच करणसोबत बी टाउन पार्ट्यांमध्ये बघावयास मिळत आहे. नुकतेच साराला शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत बघितले होते. पार्टीत साराने बेस्ट आउटफिट घालण्याचा प्रयत्न केला होता.