Join us  

Video Viral सारा अली खानचा हा अंदाज पाहून युजर्स म्हणतायेत......

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 2:24 PM

'सिम्बा' ने बॉक्स आफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या सिनेमानंतर सारा अली खान सर्वात जास्त कमाई करणारी न्यूकमर ठरली होती.

सारा अली खान स्टारकिड असली तरी अल्पावधीतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचेही लाखो लोक आज दिवाने आहेत. त्यामुळे साराचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खासच असतो. सोशल मीडियावर साराचा असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. कपिल शर्मा शोमध्ये सारा अली खान, रोहित शेट्टी आणि रणवीर सिंह सोबत 'सिम्बा' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावली होती. 

त्यावेळचा तिचा हा व्हिडीओ आहे. या शोमध्ये हात जोडून रोहित शेट्टीकडे काम मागितल्याचे तिने सांगितले होते. नवाब सैफ अली खानची मुलगी रोहित शेट्टीपुढे हात पसरवत काम मागत आहे हे पाहताच माझ्याही डोळ्यात पाणी आले नवाबच्या मुलीला कामाची कसली आली गरज पण तरीही काम करण्याची मेहनत करण्याची साराची तळमळ पाहून तिला सिनेमात काम करण्याची संधी दिल्याचे रोहित शेट्टीनेही मान्य केले होते.

 

मात्र त्यानंतर सारा आणि रोहित शेट्टी जबरदस्त ट्रोलही झाले होते.अनेक युजर्सने काम मिळविण्यासाठी रोहित शेट्टीकडे जाण्याचा सल्ला दिला होता.इतकेच काय तर शोदरम्यान साराचा मजेशीर अंदाजही पाहायला मिळाल होता. 

फनी अंदाजात साराने चे-यावरचे हावभाव पाहून कपिल शर्मानेही साराची आई अमृता सिंगला धन्यवाद तुम्ही इतका सुंदर प्रोडक्ट प्रोड्युस केल्याबद्दल म्हटले होते. यामुळेदेखील सारा तुफान ट्रोल झाली होती. ओव्हर एक्टींग की दुकान म्हणत अनेककदा साराला ट्रोल केले गेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

चाहतेही मजा घेत तिची जोरदार खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर सारा अली खानचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तिने स्टार किड असल्याचा अभिनय क्षेत्रात फायदा होत असल्याचे मान्य केले होते.  'सिम्बा' ने बॉक्स आफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या सिनेमानंतर सारा अली खान सर्वात जास्त कमाई करणारी न्यूकमर ठरली होती. 

टॅग्स :सारा अली खानकपिल शर्मा