Join us  

सारा अली खानला सारेगमपाच्या सेटवर मिळाले हे क्यूट गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:32 PM

सारा अली खान सारेगमपा या कार्यक्रमाच्या सेटवर तिच्या केदारनाथ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतसोबत आली होती. त्यावेळी तिला या कार्यक्रमाच्या टीमने एक खूप छान गिफ्ट दिले.

ठळक मुद्दे हे गिफ्ट म्हणजे तिचा लाडका भाऊ तैमुर सारखा हुबेहुब दिसणारा तैमुर बाहुला. ती या बाहुल्याला संपूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान मांडीवर घेऊन बसली होती. एवढेच नव्हे तर या बाहुल्याचे ती सतत लाड देखील करत होती. तैमुर हा साराचा खूपच लाडका आहे, ती सोशल मीडियावर अनेकवेळा त्याच्यासोबत फोटो शेअर करत असते.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान केदारनाथ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आगमन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी ती सोडत नाहीये. नुकतीच ती सारेगमपा या कार्यक्रमाच्या सेटवर तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतसोबत आली होती. त्यावेळी तिला या कार्यक्रमाच्या टीमने एक खूप छान गिफ्ट दिले. हे गिफ्ट म्हणजे तिचा लाडका भाऊ तैमुर सारखा हुबेहुब दिसणारा तैमुर बाहुला. ती या बाहुल्याला संपूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान मांडीवर घेऊन बसली होती. एवढेच नव्हे तर या बाहुल्याचे ती सतत लाड देखील करत होती. तैमुर हा साराचा खूपच लाडका आहे, ती सोशल मीडियावर अनेकवेळा त्याच्यासोबत फोटो शेअर करत असते.

खेळणी बनवणाऱ्या एका कंपनीने तैमुर बाहुला बाजारात आणला आहे. एका चॅनलशी संबंधित अश्विनी यारदी यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या तैमुर  बाहुल्याचे फोटो शेअर केले होते. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकला जात आहे, असे अश्विनीने आपल्या या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. 

 

तैमुर अली खानचे फोटो बॉलिवूड स्टार्सपेक्षाही महाग विकले जातात. काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये खुद्द करण जोहरने याचा खुलासा केला होता. तैमुर  बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही लोकप्रिय आहे. त्याचे फोटो सर्वाधिक किमतीत विकले जातात. तैमुरच्या एका फोटोची किंमत १५०० रूपये आहे, असे मला कळले आहे, असे करण जोहरने सांगितले होते. तैमुरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. 

करिना आणि सैफ यांच्या तैमुरचा एक चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो. सैफ करिना तैमूरला जास्त अटेन्शन मिळत असल्यामुळे थोडे त्रस्त आहेत. तैमुरसाठी करीना कपूर दोन वर्षं बॉलिवूडपासून दूर होती. दोन वर्षानंतर करीनाने वीरे दी वेडिंगमधून पुनरागमन केले. यातील तिने साकारलेली वीरेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. आता ती करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसणार आहे.

 

टॅग्स :सारा अली खानतैमुरसैफ अली खान सा रे ग म प