Join us  

सारा-कार्तिकच्या ‘लव्ह’ सीन्सला सेन्सॉर बोर्डाची कात्री? अशी आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:20 AM

सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाना  यु/ए सर्टिफिकेट दिले. पण यासाठी इम्तियाज अली यांना मोठी किंमत चुकवावी लागली.

ठळक मुद्दे‘लव्ह आज कल’ हा सिनेमा इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेला आहे. 2009 मध्ये इम्तियाजने याच नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

येत्या शुक्रवारी व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेल्या कार्तिक आर्यनसारा अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अलीकडे या रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये कार्तिक व साराची बोल्ड केमिस्ट्री पाहायला मिळाली.  ताजी बातमी म्हणजे, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाना  यु/ए सर्टिफिकेट दिले. पण यासाठी इम्तियाज अली यांना मोठी किंमत चुकवावी लागल्याची चर्चा आहे.

होय, चर्चा खरी मानाल तर इम्तियाज अलीच्या या चित्रपटातील अनेक इंटिमेट सीन्सला कात्री लावण्यात आली. एका एंटरटेनमेंट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटातील बहुतांश इंटिमेट सीन्स कापून त्यांची लांबी कमी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला येणा-या किसींग सीन्सलाही कात्री लावून या सीनचा अवधी कमी करण्यात आला. यानंतर येणा-या लव्ह मेकिंग सीनवरही सेन्सॉरची कात्री चालली. केवळ इतकेच नाही तर या इंटिमेट सीननंतर अभिनेत्रीच्या क्लीवेजला ब्लर केले जावे, असे आदेशही सेन्सॉरने मेकर्सला दिल्याचे कळतेय. याशिवाय लीड अ‍ॅक्टर्स कपडे काढत असल्याचा एक सीन या चित्रपटात आहे. या सीनवरही सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवल्याचे कळतेय.

वृत्तानुसार, चित्रपटात ऑडिओ सेन्सरिंगही केली गेली आहे. सेक्शुअली हा शब्द गाळून त्याठिकाणी नव्या शब्दाचा वापर करण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. ‘फ’ पासून सुरु होणा-या एका आक्षेपार्ह शब्दालाही म्यूट करण्यात आहे आहे. ‘हरामजादों’ शब्द बदलून ‘बेशर्मो’ या शब्दाचा वार करण्यात आले आहे.‘लव्ह आज कल’ हा सिनेमा इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेला आहे. 2009 मध्ये इम्तियाजने याच नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्या सिनेमात दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान लीड रोलमध्ये होते.

टॅग्स :लव आजकलसारा अली खानकार्तिक आर्यन