Join us  

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनसाठी 'ही' आहे प्रेमाची व्याख्या

By प्राजक्ता चिटणीस | Published: February 14, 2020 6:00 AM

सारा आणि कार्तिकने त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे काय याविषयी लव्ह आज कल २ च्या प्रमोशनच्यावेळी सांगितले.

ठळक मुद्देसारा आणि कार्तिक यांच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे असे विचारले असता साराने सांगितले, प्रेम म्हणजे काय हे शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती एक भावना आहे, जी समजून घ्यायची आहे. त्यावर कार्तिकने देखील प्यार एक एहसास है असा फिल्मी डायलॉग मारला.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. हीच जोडी प्रेक्षकांना लव्ह आज कल २ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिकसोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. ते दोघेही सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यग्र आहेत. त्यामुळे अतिशय धावपळीत पण तितकीच मजा मस्तीत त्यांनी ही मुलाखत दिली.

आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमँटिक कथा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे लव्ह आज कल २ मधील प्रेमकथा आजवरच्या चित्रपटांपेक्षा कशी वेगळी असणार असे विचारले असता सारा म्हणाली, प्रेमकथा ही अनेकवेळा सारखीच असते. प्रेमकथेत जोडपी एकत्र येतात किंवा ती विभक्त होतात. केवळ प्रत्येक जोडप्याचा प्रवास हा वेगळा असतो. आमच्या चित्रपटातील जोडप्यांचा देखील एक वेगळा प्रवास दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

लव्ह आज कल या चित्रपटात सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या सेटवर सारा अनेकवेळा तिच्या वडिलांसोबत जायची. या आठवणीविषयी ती सांगते, मी लव्ह आज कलच्या सेटवर जाऊन केवळ मजा मस्ती करायचे. त्यावर लगेचच कार्तिकने तिची टर उडवत म्हटले की, तू लव्ह आज कल २ च्या सेटवर देखील हेच करायची. त्यावर साराला देखील तिचे हसू आवरले नाही.

कार्तिक आर्यनने लव्ह आज कल हा चित्रपट पाहिला त्यावेळी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळेल असा त्याने कधी विचार देखील केला नव्हता. याविषयी तो सांगतो, लव्ह आज कल २ या चित्रपटात काम करण्याचे कधी मी स्वप्न देखील पाहिले नव्हते. इम्तियाज अली यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करायला मिळावे अशी माझी नेहमीच इच्छा होती. मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले आणि त्यातही मला इतकी चांगली व्यक्तिरेखा साकारायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. 

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे असे विचारले असता साराने सांगितले, प्रेम म्हणजे काय हे शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती एक भावना आहे, जी समजून घ्यायची आहे. त्यावर कार्तिकने देखील प्यार एक एहसास है असा फिल्मी डायलॉग मारला. तो म्हणाला, नात्यात असताना गुदमरल्यासारखे वाटत असेल तर त्या नात्यात राहाणे चुकीचे आहे. तुम्ही एकमेकांसोबत खूश असाल तरच एकमेकांसोबत राहा असेच मला वाटते.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनलव आजकल