Join us  

आमिरनंतर सान्या मल्होत्रा बनणार विद्या बालनची लेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 6:00 AM

सध्या ‘फोटोग्राफर’ आणि ‘मनमर्जिया’ हे दोन सिनेमे सान्याच्या हातात आहेत. याशिवाय आणखी एका चित्रपटात सान्याची वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देहा चित्रपट ‘सुपर कंप्युटर’ म्हणून ओळखल्या जाणा-या महान गणितज्ञ शकुंतला देवी यांचे बायोपिक आहे.

‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिर खानच्या लहान मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या जाम बिझी आहे. होय, सान्याला एका पाठोपाठ एक अशा चित्रपटाच्या आॅफर्स मिळत आहेत. अलीकडे सान्याचा ‘पटाखा’ व ‘बधाई हो’ हे चित्रपट रिलीज झालेत. ‘पटाखा’ला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पण ‘बधाई हो’ या सान्याच्या चित्रपटाने धूम केली. सध्या ‘फोटोग्राफर’ आणि ‘मनमर्जिया’ हे दोन सिनेमे सान्याच्या हातात आहेत. याशिवाय आणखी एका चित्रपटात सान्याची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात सान्या अभिनेत्री विद्या बालनला टक्कर देताना दिसणार आहे.

ताजी बातमी खरी मानाल तर रोनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी बॅनरखाली तयार होत असलेल्या चित्रपटासाठी सान्याला साईन करण्यात आले आहे. हा चित्रपट ‘सुपर कंप्युटर’ म्हणून ओळखल्या जाणा-या महान गणितज्ञ शकुंतला देवी यांचे बायोपिक आहे. विद्या बालन यात शकुंतला देवीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. शकुंतला देवी यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटले जायचे. कारण त्या कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करायच्या. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50व्या सेकंदाला 201चे 23चे वर्गमूळ काढतं विक्रम रचला होता.

तूर्तास या चित्रपटातील तिची भूमिका काय असेल, हे गुलदस्त्यात आहे. मात्र सूत्रांचे मानाल तर शकुंतला  देवींच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. यावर्षी जून-जुलैमध्ये या बायोपिकचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. साहजिकच अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सान्या कमालीची उत्सुक आहे. सान्या तशीही विद्या बालनची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची संधी तिला सोडायची नव्हती.सान्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर ‘फोटोग्राफर’मध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :सान्या मल्होत्राविद्या बालन