Join us  

लॉकडाऊनमध्ये 'दंगल' फेम सान्या मल्होत्राला झाली गंभीर दुखापत, घ्यावा लागला सर्जरीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 4:47 PM

लॉकडाऊन दरम्यान सान्या घरात एकटीच होती.

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबत दुर्घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी सान्याच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तिच्या करंगळीची सर्जरी करावी लागली. सोशल मीडियावर तिने ही गोष्ट शेअर केली होती.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन दरम्यान सान्या घरात एकटीच होती. ब्लेंडरच्या मदतीने ती चटणी बनवत होती. मशीन सुरु करण्यापूर्वी ती ढाकण लावायचे विसरली आणि मशीन तशीच सुरु केली.  झाकण बंद करण्याच्या प्रयत्नात तिचा हातच आता गेला आणि करंगळी ब्लेंडरमधल्या ब्लेडवर आदळली.

या अपघातात सान्याचे प्रचंड रक्तपात झाला आणि तिची शुद्ध हरपायला लागली, ती लगेच मैत्रिणीला घरी बोलवून घेतले. मैत्रिणीने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे तिच्या करंगळीची सर्जरी करण्यात आली. गेल्या आठवड्यात सान्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते ज्यात तिच्या करंगळीला झालेली दुखापत स्पष्ट दिसत होती.  

वर्कफ्रंटबाबत बोलयाचे झाले तर सान्या लवकरच शकुंतला देवी बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये तिला ओळखताच येत नाही आहे. शकुंतला देवी चित्रपटात सान्या शकुंतला देवी यांची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सान्याने बॉलिवूडमध्ये दंगल चित्रपटातून पदार्पण केले होते. दंगलनंतर ती पटाखा, बधाई हो व फोटोग्राफ या चित्रपटात झळकली आहे.

टॅग्स :सान्या मल्होत्रा