Join us

​संजूबाबा बनला कवी लवकरच येणार ‘सलाखें’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:51 IST

पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगतानाच्या काळात दैनंदिन दिनचर्येत अभिनेता संजय दत्त बांबूचे साहित्य विणणे, पेपर बॅग बनविणे आणि रेडिओ ...

पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगतानाच्या काळात दैनंदिन दिनचर्येत अभिनेता संजय दत्त बांबूचे साहित्य विणणे, पेपर बॅग बनविणे आणि रेडिओ जाकी अशी कामे करायचा. या कामांचा त्याला मोबदलाही मिळायला. पण ही कामे केल्यानंतरही संजूबाबाकडे बराच वेळ शिल्लक राहायचा. या वेळात संजयने स्वत:ला लिखानात गुंतून घेतले आणि आणखी दोन कैद्यांना सोबत घेऊन तब्बल ५०० वर ‘शेर’ लिहून काढले. शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यावर संजयने आपला हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काव्यसंग्रहास त्याने ‘सलाखें’ असे नाव दिले आहे.  संजूबाबा याबद्दल सध्या भरभरून बोलत आहे. तो म्हणाला. जिशान कुरैशी, समीर हिंगल नामक दोन कैदी आणि मी अशा आम्ही तिघांनी ५०० ‘शेर’ लिहिले आहेत. यापैकी १०० ‘शेर’ माझे स्वत:चे आहेत. माझ्या आयुष्यातील काही अनुभव, वास्तव घटनांवर आधारित हे ‘शेर आहेत. एकदा मान्यता मला भेटायला आली होती. तिला पाहून माझे मन भरून आले. त्यादिवशी मी एक ‘शेर ’लिहिला.‘आखों में नमीं थी, बदन तप रहा था, फिर भी होठों पे हसीं थी और बातों में प्यार था... आपको देख के दुख हुआ पर खुशी भी हुई, उसी खुशी के साथ पैगाम भी था कि आप मुझसे मोहब्बत करते हो।’आता मला या सर्व काव्यरचनांचे पुस्तक काढायचे आहे. मी प्रकाशकाच्या शोधात आहो, असेही संजूबाबा म्हणला. तेव्हा संजूबाबाच्या ‘सलाखें’ला शुभेच्छा देऊ यात...बाकी काय?