चाहत्यांची कमी होत असलेली संख्या, नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी असल्याची चर्चा हे सर्व काही या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेला टीजर खूपच मनोरंजक पद्धतीने दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात संजूबाबाच्या आयुष्यातील अशा काही घटना दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. एकूणच ही एक अविश्वसनीय कथा असून, त्यास राजकुमार हिरानी यांनी अतिशय लयबद्धरीत्या मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारतानाच कथाही त्यांनीच लिहिली आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत. हा चित्रपट २९ जून २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.#sanju is a father-son story. Meet the father today - Paresh Rawal. Had fun working with him. #RanbirKapoor@VVCFilms@foxstarhindi@SirPareshRawalpic.twitter.com/GXWYaNBvm3— Rajkumar Hirani (@RajkumarHirani) May 26, 2018
‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 15:44 IST
दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या त्यांच्या आगामी ‘संजू’ या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
‘संजू’च्या नव्या पोस्टरमध्ये झाला खुलासा; सुनील दत्त यांच्या भूमिकेत असणार ‘हा’ अभिनेता!
दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या त्यांच्या आगामी ‘संजू’ या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता हिरानी यांनी नवे पोस्टर प्रदर्शित केले असून, त्यामध्ये सुनील दत्तच्या भूमिकेत अभिनेता परेश रावल दिसत आहे. पोस्टरमध्ये संजय दत्तची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता रणबीर कपूरचे ते सात्वंन करताना दिसत आहेत. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित असून, या बायोपिकमध्ये त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचे खुलासे होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या चित्रपटाचा ८५ सेकंदांचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीजर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. दरम्यान, आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरता लागली आहे. काही दिवसांपासून संजय दत्त आणि रणबीर कपूर यांच्यातील साम्यपणामुळे दोघेही भलतेच चर्चेत आहेत. दरम्यान, राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला ‘संजू’ हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्या जीवनातील चढ-उतारांवर आधारित आहे. हा चित्रपट एका प्रसिद्ध परिवारातून असलेल्या अभिनेत्याच्या जीवनाची कथा आहे. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आल्याने तो नेहमीच वादाच्या भोवºयात सापडलेला आहे. आता तो त्याच्या आयुष्यात स्थिरावला असला तरी, त्याचा भुतकाळ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हीच बाब या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.