Join us

​संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात दिसणार नवा चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 10:32 IST

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये बिझी असले तरी देखील आगामी चित्रपटाची तयारी करीत आहे. या चित्रपटातून ते ...

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये बिझी असले तरी देखील आगामी चित्रपटाची तयारी करीत आहे. या चित्रपटातून ते एका नव्या चेहºयाला संधी देणार असल्याची माहिती मिळत असून, हा चेहरा त्यांना घरीच मिळाला आहे. सोनम कपूरनंतर नव्या अभिनेत्रीला लाँच करण्याची तयारी संजय लीला भन्साळी करीत आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून अनेक कलावंतांना स्टारडम मिळाले. यात ऐश्वर्या राय, रणबीर कपूर, सोनम कपूर, दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांचा उल्लेख केला जातो. दीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या करिअरला नवी भरारी देण्यात त्यांची भूमिला मोलाची ठरली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून नवी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र या नव्या अभिनेत्रीचा शोध घेण्यासाठी भन्साळी यांना फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. त्याना हा नवीन चेहरा त्यांच्या घरीच सापडला असल्याचे कळतेय. संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल ही त्यांच्या आगामी चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणार आहे. हा चित्रपटाची निर्मिती भन्साळी करीत असले तरी दिग्दर्शनाची जबाबदारी मंगेश यांच्यावर सोपविली आहे. मंगेश याने दिलेल्या एका मुलाखतीमधून हा खुलासा झाला आहे. मंगेश म्हणाला, संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली आहे. हा म्युझिकल रोमाँटिक ड्रामा आहे. यासाठी दोन तरुण जोडप्याची गरज होती, शर्मिन या रोलसाठी परफेक्ट आहे असे आम्हाला वाटले. हा चित्रपट या वर्षांच्या अखेरीस प्रदर्शित होईल.हा बिग बजेट चित्रपट असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कोणतिही कमतरता राहू नये असे भन्साळी यांना वाटते. शर्मिन ही संजय लीला भन्साळी यांची बहीण बेला सेहगल हिची मुलगी आहे. शर्मिनचे वडील दिग्दर्शक मोहन सेहगल आहेत.