Join us  

पाहा, भन्साळींच्या नव्या चित्रपटाच्या नव्या हिरो-हिरोईनचे फोटो! तुम्हीही पडाल प्रेमात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 8:00 AM

‘मलाल’ या चित्रपटातून शर्मिन आणि मिजान यांचा डेब्यू होतोय. खुद्द संजय लीला भन्साळी लवकरच या दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत.

ठळक मुद्दे११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते.

अखेर बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्सची एन्ट्री पक्की झालीय. हे दोन स्टार कोण तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगल आणि अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी. ‘मलाल’ या चित्रपटातून शर्मिन आणि मिजान यांचा डेब्यू होतोय. खुद्द संजय लीला भन्साळी लवकरच या दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत.

शर्मिन ही भन्साळींच्या बहीणीची मुलगी आहे. शर्मिनचे टॅलेन्ट बघूनचं भन्साळींनी तिला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ तिच्याचमुळे भन्साळी ‘मलाल’ प्रोड्यूस करत आहेत.

१८ मे रोजी म्हणजे उद्या ‘मलाल’चा ट्रेलर रिलीज होतोय. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. लवकरच ती होईल. यानंतर ठरल्या तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. पण तत्पूर्वी शर्मिन आणि मिजान यांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यंग अ‍ॅक्टर्सच्या यादीत नाव चढलेल्या शर्मिन व मिजानचे हे फोटो तुम्ही बघाच आणि कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा.

भन्साळी ‘मलाल’ प्रोड्यूस करताहेत आणि मराठमोळा दिग्दर्शक मंगेश हाडवळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मंगेशने याआधी नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘देख सर्कस देख’ दिग्दर्शित केला होता.

११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला होता. पण यातील सोनम आणि रणबीरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता भन्साळी खुद्द आपल्या भाचीला लॉन्च करणार आहेत.शर्मिन सहगल व मिजान जाफरीनंतर संजय लीला भन्साळी पूनम ढिल्लोचा मुलगा अनमोल आणि पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा यांनाही लॉन्च करणार असल्याचे कळतेय. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीजावेद जाफरी