Join us  

इंशाअल्लाह! म्हणून भन्साळींनी निवडली सलमान खान-आलिया भटची ‘विजोड’ जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:01 PM

एकीकडे सलमानचे चाहते ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे अनेक लोक सलमान आणि आलियाच्या वयाच्या अंतरावरून खिल्ली उडवू लागले आहेत. इतकी ‘विजोड’ जोडी भन्साळींनी निवडलीच कशी, असा अनेकांचा प्रश्न आहे. पण आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे. 

ठळक मुद्देसलमान आलियापेक्षा २७ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

संजय लीला भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या चित्रपटात प्रथमच सलमान खान -आलिया भटची जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. एकीकडे सलमानचे चाहते हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे अनेक लोक सलमान आणि आलियाच्या वयाच्या अंतरावरून खिल्ली उडवू लागले आहेत. इतकी ‘विजोड’ जोडी भन्साळींनी निवडलीच कशी, असा अनेकांचा प्रश्न आहे. पण आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे. होय, भन्साळींनी जाणीवपूर्वक सलमान व आलियाला या चित्रपटासाठी निवडले. त्यांच्या वयातील अंतर ही कथेची मागणी होती, अशी नवी माहिती आता समोर आलीय.

मुंबई मिररने दिलेले वृत्त खरे  मानाल तर, भन्साळींच्या या चित्रपटात सलमान खान चाळीशीच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर आलिया त्याच्यापेक्षा अर्धा वयाच्या एका तरूण अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. म्हणजेच, चित्रपटात वेगवेगळ्या जनरेशनची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भन्साळींनी आपल्या या चित्रपटासाठी जाणीवपूर्वक सलमान व आलियाची निवड केली, हे स्पष्ट आहे. लवकरच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुरु होणार आहे. वाराणसी, हरिद्वार याशिवाय अमेरिकेत या चित्रपटाचे शूटींग होणार आहे.

सलमान आलियापेक्षा २७ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अगदी यावरून आलियाला ट्रोलही केले होते. पडद्यावर ही जोडी फ्लॉप होणार, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आलिया यावर बोलली होती.  ‘सलमानसोबत काम करणार म्हटल्यावर मला ट्रोल केले जातेय. पण माझ्यामते, ही सुद्धा एकप्रकारची एक्साइटमेंट आहे. टीकेऐवजी मला याबद्दल लोकांमधील उत्सुकताच अधिक जाणवली. माझे स्वत:चे सांगायचे झाल्यास, मी यामुळे जराही चिंतेत नाही. सलमान व भन्साळी सरही यामुळे चिंतेत असतील, असे मला वाटत नाही. संजय सरांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्यांनी स्टारकास्ट निवडली असेल तर त्यामागेही त्यांचा काही उद्देश असेल. माझ्यामते, संजय सर आणि त्यांच्या दूरदृष्टीवर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा,’असे आलिया म्हणाली होती.

टॅग्स :सलमान खानआलिया भटसंजय लीला भन्साळी