Join us  

मान्यता दत्तच्या घायाळ करणा-या अदा पाहून, संजय दत्तचे फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 4:04 PM

मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती.

सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. सोशल मीडियार प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगते. अभिनेत्यांच्या पत्नीबरबरचे रोमँटीक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचाही सोशल मीडियावर अभिनेत्रींप्रमाणेच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. मान्यताच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नजर टाकली तर तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. इंडो वेस्टर्न पासून वेस्टर्न, पारंपरिक अंदाजातील फोटोही नेहमी वाहवा मिळवत असता. मान्यताच्या  एका फोटोने पुन्हा लक्ष  वेधून घेतले आहे.

 

हॉट आणि बोल्ड अंदाजातील तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्षा वेड लावतील अशाच आहेत. मान्यता आपली लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे. मान्यताचे जुने फोटो आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

 

तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे.फिटनेसच्या बाबतीत मान्यता इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.

संजय दत्तच्या कुटुंबातील लोकांसोबत बऱ्याच लोकांना त्याचं मान्यता सोबतच्या नात्यामुळे खूश नव्हते. मात्र एकमेकांवरील प्रेम व विश्वासाच्या जोरावर बॉलिवूडमधील मोस्ट लविंग कपल्स म्हणून ते ओळखले जातात.मान्यचा दत्तने फिल्मी करियरची सुरूवात बी ग्रेड चित्रपटातून केली होती. याशिवाय ती २००८ साली कॉमेडी चित्रपट मेरे बाप पहले आपमध्ये दिसली होती. त्याशिवाय ती अभिनेता निमित वैष्णवसोबत लवर्स लाइक यासारख्या सिनेमात झळकली आहे.

मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती.2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख.

22 जुलै 1978 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. पण ती लहानाची मोठी झाली ती दुबईत. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता याच नावाने ती ओळखली जाऊ लागली.

टॅग्स :संजय दत्त