पुढच्या वर्षी रिलीज होणार संजय दत्तचा बायोपिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 17:04 IST
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होतेय. या चित्रपट संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतोय. ज्यासाठी ...
पुढच्या वर्षी रिलीज होणार संजय दत्तचा बायोपिक
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होतेय. या चित्रपट संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतोय. ज्यासाठी रणबीर खूप मेहनत घेताना दिसतोय मग ते लूकच्या बाबतीत असो किंवा वजनाच्या बाबतीत असो. याचित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करता येत. रणबीर कपूरला संजय दत्तची भूमिका करताना बघण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत. चित्रपट समीक्षक तरुण आदर्श ने ट्वीट करुन प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखीन वाढवली आहे. 30 मार्च 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे. याआधी हा चित्रपट सलमान खानच्या टायगर अभी जिंदा है सोबत रिलीज करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता संजय दत्तच्या बायोपिकची रिलीज टेडसमोर आली आहे. तरुण आदर्शनी ट्वीट करत लिहिले आहे 30 मार्च 2018 ला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आतापर्यंत या चित्रपटाचे नाव फायनल नाही झाले. बायोपिकमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दिसणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर संजयचे लूक बदलले आहे. अगदी त्याचप्रमाणे चित्रपटातील रणबीरचे लूकही बदलणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसेल. ‘रॉकी’ ते ‘खलनायक’ आणि ‘खलनायक’ ते ‘मुन्नाभाई’ अशा सगळ्या चित्रपटात संजय दत्त वेगवेगळ्या रूपात दिसला. शूटिंग दरम्यान संजय दत्तने सेटवर व्हिजीट देत रणबीरला सरप्राईज दिले होते. तसेच त्यांने यावेळी रणबीरच्या अभिनयाचे कौतुकदेखील केले होते.