Join us  

Sanjay Dutt ला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा,हा वीजा मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 8:42 PM

नुकतेच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. खुद्द संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. मान्यता दत्तसह संजय दत्त आनंदात संसार करत आहेत. संजय दत्तनं यंदाचं रमजान ईद दुबईमध्ये साजरा केला.पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर या खास क्षणांची फोटो  शेअर केला होती. संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते, योग्य उपचार घेतल्यानतंर संजूबाबाने कर्करोगावर मात केली आणि पुन्हा एकदा जोमाने त्याच्या कामाला सुरुवात केली होती.

संजय दत्तचे कुटुंब बहुतेक वेळा दुबईमध्ये राहते. त्यामुळे उपचारादरम्यानही अधून मधून मान्यता आणि मुलांना भेटण्यासाठी दुबईला ये जा करायचा. गेल्या काही महिन्यांपासून संजय दत्त त्याच्या कुटूंबासह दुबईमध्येच राहत आहे. नुकतेच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. खुद्द संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

ट्विटर एक पोस्ट शेअर करत त्याने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत. हा व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा बॉलिवूडचा पहिला अभिनेता आहे.सोशल मीडियावर संजय दत्तनेही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. शेअर करताना संजय दत्तने काही फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करत लिहिले आहे की, '@GDRFADUBAI चे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री  यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे.

 

'फ्लाई दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचं देखील आभार मानले आहेत.विशेष म्हणजे गोल्डन व्हिसा मिळवणारे परदेशी नागरिकांना युएईच्या नागरिकांप्रमाणे अधिकार दिले जातात. युएईचा गोल्डन व्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी दिला जातो.

टॅग्स :संजय दत्त