Join us  

'मुन्ना भाई एमबीबीएस'ला 20 वर्षे पूर्ण, वडिलांच्या आठवणीत भावूक झाला संजय दत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 6:12 PM

आज म्हणजेच १९ डिसेंबरला या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नाव आवर्जुन घेतले जाते. आज म्हणजेच १९ डिसेंबरला या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी फार गाजली होती. मुन्नाभाई ही भूमिका संजय दत्तने साकारली होती तर सर्किट ही भूमिका अर्शद वारसीने साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात  दिवंगत अभिनेते आणि संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनीही छोटीशी भुमिका साकारली होती. वडिलांच्या आठवणीत संजय दत्तने आज त्याच्या इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला.

संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले, 'दोन दशकांचे हास्य, भावना आणि जादूई मिठी! मुन्ना भाई एमबीबीएसची २० वर्षे साजरी करत आहे. अविस्मरणीय क्षणांनी भरलेला प्रवासाला २० वर्ष पुर्ण झाली आहेत.  प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे.  आशा आहे की 'मुन्ना भाई 3' लवकरच बनेल'. संजय दत्तच्या चाहत्यांनी  पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

सर्किट उर्फ ​​अर्शद वारसीने चित्रपटातील त्याचा आणि संजय दत्तचा जुना फोटोही शेअर केला आहे. संजय दत्त आणि अर्शद वारसी हे दोन्ही कलाकार 'वेलकम बॅक टू द जंगल'मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. अक्षय कुमार, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर असे अनेक कलाकार या सिक्वेलमध्ये एकत्र येणार आहेत.

'मुन्ना भाई एमबीबीएस' चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन 23.13 कोटी होते. या चित्रपटाने जगभरात सुमारे 34.6 कोटींची कमाई केली होती. 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटाने 74.88 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात 127.55 कोटींची कमाई केली होती.

टॅग्स :संजय दत्तसेलिब्रिटीबॉलिवूड