Join us  

संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 8:17 AM

‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे?

‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आलीय, असा जाहीर ठपकाही ठेवला गेला आहे. या आरोपावर खुद्द संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे?

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजयने या प्रश्नाचे उत्तर दिले. राजकुमार हिराणींनी जनमानसातील तुझी प्रतिमा बदलण्यासाठी ‘संजू’ काढला, या आरोपावर तू काय म्हणशील, असा प्रश्न संजयला यावेळी करण्यात आला. यावर संजयने थेट बोलणे टाळले. कुणीच जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठी २५ ते ३० कोटी रूपये खर्च करणार नाही, केवळ एवढेच तो म्हणाला.संजय दत्त एक चांगला माणूस आहे. त्याच्याकडून काही चूका झाल्यात. पण म्हणून तो वाईट नाही, असेही संजय दत्त या मुलाखतीत म्हणाला. एक काळ असा होता, ज्यावेळी मी आत्महत्येचा विचार केला होता. पण मी त्यातून बाहेर पडलो. तुरुंगातील त्या दिवसांनी माझ्यात प्रचंड बदल घडवलेत. आता मी कमालीचा धार्मिक झालो आहे. ऋग्वेद, शिवपुराण, सामवेद आदी धार्मिक ग्रंथ मी वाचलेत, असे संजयने सांगितले.‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर 'संजू'चे चाहते आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. दुसरीकडे या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर सगळ्या सिनेमांना मागे टाकत जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

टॅग्स :संजू चित्रपट 2018संजय दत्तबॉलिवूडराजकुमार हिरानी