Join us  

जेव्हा ‘त्या’ रात्री नशेत तर्र असलेल्या संजय दत्तला खोलीत पाहून प्रचंड घाबरल्या होत्या श्रीदेवी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 11:37 AM

हा किस्सा 80 च्या दशकातला. श्रीदेवी त्याकाळात मोठ्या सुपरस्टार होत्या तर संजय दत्त अगदी नवखा सिनेइंडस्ट्रीत आला होता...

ठळक मुद्देया घटनेनंतर काळ बदलला, तसेच संजय दत्तचे नशीबही. काळासोबत संजयही बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. ‘जमीन’ या सिनेमासाठी संजयला साइन करण्यात आले.

चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से, सेटवरच्या रंजक घटना, आठवणी प्रसिद्ध आहेत. संजय दत्त (Sanjay Dutt) आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा एक किस्साही एकेकाळी खूप गाजला होता. होय, एका घटनेनंतर श्रीदेवींनीसंजय दत्तला पुन्हा कधीही न भेटण्याचा निर्णय घेतला होता, का? तर त्यासाठी तुम्हाला पुढची स्टोरी वाचावी लागेल.तर हा किस्सा 80 च्या दशकातला. श्रीदेवी त्याकाळात मोठ्या सुपरस्टार होत्या तर संजय दत्त अगदी नवखा सिनेइंडस्ट्रीत आला होता. श्रीदेवीसारख्या सुपरस्टार अभिनेत्रीला भेटायची ओढ कुणाला नसेल? संजूबाबाही श्रीदेवींना भेटायला आतूर होता. याचदरम्यान श्रीदेवी ‘हिम्मतवाला’च्या शूटींगसाठी आल्या असल्याचे त्याला कुणीतरी सांगितले. मग काय? संजूबाबा स्वत:ला रोखू शकला नाही आणि तो त्यांना भेटण्यासाठी सेटवर पोहोचला. पण नशेत तर्र होऊन. (Sanjay Dutt entered Sridevi's hotel room in a drunk )

नशेत तर्र संजय सेटवर पोहोचला, तेव्हा त्याला धड उभेही राहता येईना. त्याने सेटवरच्या लोकांना श्रीदेवींच्या खोलीचा पत्ता विचारला आणि कोणालाच न सांगता त्यांच्या खोलीत शिरला. नशेत तर्र असलेल्या संजयला खोलीत पाहून श्रीदेवी प्रचंड घाबरल्या. त्याचे ते वागणे श्रीदेवींना अजिबात आवडले नाही.   संजयला आयुष्यात कधीच न भेटण्याचा निर्णय त्यांनी त्याक्षणीच घेतला...

पण पुढे सोबत काम केले...या घटनेनंतर काळ बदलला, तसेच संजय दत्तचे नशीबही. काळासोबत संजयही बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. ‘जमीन’ या सिनेमासाठी संजयला साइन करण्यात आले.  आश्चर्य म्हणजे, या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रीदेवींना साईन करण्यात आले. संजय सुपरस्टार होता आणि त्याच्यासोबत सिनेमा करण्यास श्रीदेवी आता नकार देऊ शकत नव्हत्या. अर्थात हा सिनेमा साईन करताना श्रीदेवींनी म्हणे अनेक अटी लादल्या होत्या. याच अटींमुळे हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही, असेही म्हटले जाते.यानंतर ‘गुमराह’ या सिनेमाच्या निमित्ताने नियतीने पुन्हा एकदा संजय व श्रीदेवींना एकत्र आणले. पण सेटवर दोघांमध्येही अनेकदा खटके उडायचे. कसेबसे सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले. हा सिनेमा प्रदर्र्शित झाला. श्रीदेवी-संजयची पडद्यावरची जोडी पे्रक्षकांना खूप भावली.

टॅग्स :श्रीदेवीसंजय दत्त