Join us  

संजय दत्तने जेलमध्ये असताना कमावलेल्या पैशांमधून केले होते हे काम, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:14 PM

संजय दत्त आणि प्रिया काही वर्ष एकमेकांपासून दूर होते … पण संजयवर संकटाच वादळ येताच प्रियाने आपला खांदा धीर देण्यासाठी पुढे केला .

1993 च्या बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगणा-या संजय दत्तला सुप्रिम कोर्टाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी जेलमध्ये असताना संजूबाबा इतर कैदीसोबत वेगवेगळी काम करायचा. न्यूजपेपर पासून कार्ड्स बनवणे. फर्नीचर बनवणे अशी वेगवेगळी काम करत स्वतःला बिझी ठेवायचा. यातून कैदींना कामाचा मोबदला म्हणून पैसेही दिले जायचे. एक पेपर बॅग बनवायचे 10 पैसे संजूबाबाला जेलमध्ये मिळायचे. रिअल लाईफमध्ये  तीन ते  पांच  करोड़ रुपये कमावणारा संजूबाबा जेलमध्ये मात्र दिवसाला 25 रूपये कमवायचा. त्यानुसार करोडोंमध्ये खेळणारा या अभिनेत्याला महिन्यातून 26 दिवस काम करावं लागायचे आणि त्याची महिन्याची कमाई असायची फक्त 650 रूपये.

हे सगळे पैसे जमवत रक्षांबधन सणाच्या  दिवशी बहिणींना त्याच पैशांतून  भेटवस्तू द्यायचा. संजय दत्तच्या जीवनात अनेक वळणं आली. पण या वळणावर त्याच्या घराचे  ठामपणे पाठीमागे उभे होते .संजय दत्तच्या दोन बहिणी एक  प्रिया  आणि दुसरी  नम्रता दत्त .संजय आणि प्रिया काही वर्ष एकमेकांपासून दूर होते … पण संजयवर संकटाच वादळ येताच प्रियाने आपला खांदा धीर देण्यासाठी पुढे केला .

आजही जेलमधल्या सगळ्या गोष्टी संजूबाबाच्या मनात घर करून आहेत. नेहमी प्रमाणे भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर बसून आरामात जेवणारा हा सेंलिब्रिटी.....पण जेलमध्ये मात्र एका आरोपी प्रमाणेच लाईन लावून हातात ताट घेवून जेवन घ्यायचा. परिणामी  जेलमध्ये संजय दत्तचं काम चांगल आणि शिस्तप्रिय राहिलं त्यामुळे जेल अधिकाऱ्यांनी त्याला  मिळणारे मानधनही वाढवून दिले होते. अशाप्रकारे जेलमध्ये एक नायक नाही तर खलनायकाप्रमाणे त्याला शिक्षा भोगावी लागली.

 

टॅग्स :संजय दत्त