Join us  

ही आहे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 2:39 PM

ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याची पत्नी असून तिने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ठळक मुद्देत्रिशालाने इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिच्या आईचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिची आई रिचा खूपच सुंदर दिसत असून रिचा खूपच छान दिसायची, तिचे आम्ही फॅन होतो असे कमेंटच्या माध्यमातून अनेकजण सांगत आहेत. 

संजय दत्तने आज बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयावर त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे खाजगी आयष्य देखील चर्चेचा विषय बनले आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. संजय दत्तच्या संजू या चित्रपटात त्याच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असला तरी त्याच्या दोन पत्नींचा चित्रपटात कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही. 

संजय दत्तची तीन लग्नं झाली असून त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रिचा शर्मा होते. रिचा आणि संजय यांना त्रिशाला ही मुलगी असून ती परदेशात राहाते. त्रिशाला सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिच्या आईचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिची आई रिचा खूपच सुंदर दिसत असून रिचा खूपच छान दिसायची, तिचे आम्ही फॅन होतो असे कमेंटच्या माध्यमातून अनेकजण सांगत आहेत. या फोटोवर संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने देखील ब्युटीफूल अशी कमेंट केली आहे.

त्रिशालाने शेअर केलेला हा फोटो 1979 मधील असून रिचाच्या कॉलेजजीवनातील आहे. रिचाने देखील काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि रिचा यांचे लग्न 1987 मध्ये झाले. लग्नानंतर रिचाने बॉलिवूड इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. लग्नाच्या काहीच वर्षांनंतर रिचाला कॅन्सरने ग्रासले आणि १९९६ मध्ये तिचे निधन झाले. रिचाच्या निधनानंतर संजयने रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले. रियासोबत घटस्फोट झाल्यानंतर मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय आणि मान्यता यांनी काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजय आणि मान्यता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश असून त्यांना दोन मुले देखील आहे.

टॅग्स :संजय दत्त