Join us  

अभिनेता कुमार गौरवच्या लेकीचे लग्न,  ‘मामू’ संजय दत्तची ग्रॅण्ड एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:43 AM

बॉलिवूड अभिनेता कुमार गौरव आणि नम्रता दत्त यांची लाडकी लेक सिया हिने बॉयफ्रेन्ड आदित्यसोबत लग्नगाठ बांधली.

ठळक मुद्देकुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा.

बॉलिवूड अभिनेता कुमार गौरव आणि नम्रता दत्त यांची लाडकी लेक सिया हिने बॉयफ्रेन्ड आदित्यसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नाचे सर्वाधिक लक्ष वेधले ते संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी. या दोघांनीही मुलांसोबत या लग्नाला हजेरी लावली. 1984 मध्ये कुमार गौरवने सुनील दत्त यांची मुलगी आणि संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिच्यासोबत लग्न केले. दोघांनाही साची आणि सिया अशा दोन मुली आहेत. त्यामुळे सिया व साची या दोघी संजयच्या भाच्या. कुमार गौरव हा संजयचा खूप चांगला आणि जुना मित्र आहे. संजयच्या चांगल्या वाईट अशा दोन्ही काळात कुमारने संजयला सोबत केली.

‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला ओळखणेही कठीण झाले आहे. 1981 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून कुमार गौरवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कुमारचे नशीब की, त्याचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण हे यश त्याला टिकवता आले नाही.

कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा. अन्य वडिलांप्रमाणे राजेंद्र कुमार यांनीही मुलाचे करिअर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत.   माधुरी दीक्षितला घेऊन ‘फूल’ हा  चित्रपट त्यांनी काढला. पण तोही सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर कुमार गौरवने  तेरी कसम, जानम,  गूंज, सियासत अशा अनेक चित्रपटांत काम केले, पण त्याला यश मिळाले नाही. पुढे फिल्म इंडस्ट्रीत जम बसणार नाही, हे कुमार गौरवला कळून चुकले आणि त्याने बिझनेस करायचे ठरवले. सध्या तो मालदीवमध्ये  ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतो. त्याचा कन्सट्रक्शनचाही बिझनेस आहे. 

टॅग्स :संजय दत्त