Join us  

सलमान खानवरून गर्लफ्रेंडवर हा प्रसिद्ध कोरियोग्राफर घ्यायचा संशय, असा द्यायचा तिला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:20 AM

सलमानवरुन एक डान्स कोरिओग्राफर आपल्या गर्लफ्रेंडवर संशय घेत होता अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान याच्या अफेयर व मैत्रीचे बरेच किस्से आपल्याला वारंवार ऐकायला मिळत असते. त्याच्या लव्ह लाइफच्या चर्चा ऐकून नवल वाटण्यासारखे काहीच नाही. त्याच्या बॉलिवूडच्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. मात्र तरीदेखील अद्याप तो सिंगल आहे. मात्र सलमानवरुन एक डान्स कोरिओग्राफर आपल्या गर्लफ्रेंडवर संशय घेत होता अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे या कोरिग्राफरच्या गर्लफ्रेंडने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान आणि तिचा बॉयफ्रेंड मेल्विन लुईस यांचे काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं आहे. त्यानंतर सनाने मेल्विनवर तिला मारहाण करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तिनं मेल्विन बद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मेल्विन सलमान खानवरुन सनावर संशय घेत असे आणि तो नेहमीच तिला सलमानपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असे असा खुलासा सनाने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सना खान म्हणाली, सलमान खान आणि माझे खूप चांगले नाते आहे. त्याने नेहमीच मला आदराने वागवले आहे. तो नेहमीच मला माझ्या भावासारखा आहे. मी त्याला कधीही राखी बांधू शकते. त्याचा भाऊ सोहेलसोबतही माझे चांगले संबंध आहेत.

ती पुढे म्हणाली, 'मेल्विनच्या डोक्यात नेहमीच एकाच प्रकारचे विचार येत असत. एकदा मला 'जुम्मे की रात है' या गाण्यावर लहानसा परफॉर्मन्स द्यायचा होता. त्यावर त्याने मला असंख्य प्रश्न विचारले. माझ्यावर संशय घेतला आणि मी खोटे बोलत असल्याचेही आरोप केले.'

सना खाननं 2014 मध्ये रिलीज झालेल्या जय हो सिनेमात सलमानसोबत काम केले होते. 

टॅग्स :सलमान खानसना खान