Join us  

सुशांतला बिझी ठेवण्यासाठी रिया चक्रवर्ती वरचेवर ठेवायची पार्टी, सॅम्युअल मिरांडाचा सीबीआयसमोर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:40 PM

जुलै 2019ला रिया गोव्याला गेली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या केसचा तपास सीबीआय वेगाने करत आहे. सोबतच दररोज वेगवेगळे खुलासे वेगवेगळ्या लोकांकडून केले जात आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाने सीबीआय चौकशी सांगितले की, मला सुशांतची बहीण प्रियंका आणि तिचा पती सिद्धार्थने कामावर ठेवले होते. त्यांनी मला सांगितले की घराची देखभाल करणे, स्टाफला हँडल करणे आणि त्यांना पगार देणे या सर्व गोष्टी माझ्या हातात असतील. एक दिवस प्रियंका स्टाफ अब्बासवर भडकली होती. त्यावेळी दिपेशनेसुद्धा अब्बाससोबत नोकरी सोडली होती. सुशांतचे  बहीण प्रियंका आणि तिच्या नवरासोबत भांडण झाले आणि त्यानंतर ते दोघे आपल्या घरी निघून गेले. '

रिया ठेवायची घरी पार्टी सॅम्युअलने पुढे सांगितले की, रिया चक्रवर्तीच्या मे 2019 पासून फेऱ्या वाढल्या होत्या. जुलै 2019ला ती गोव्याला गेली होती. तिथून परत आल्यावर  श्रुती मोदीला  सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून कामावर ठेवलं आणि रियाने सुशांतबरोबर राहण्याची सुरुवात केली. रियाचा भाऊ शौविक आणि वडीलही सुशांतच्या घरी यायचे.सुशांत त्याच्या फायनान्सला घेऊन काळजीत होता.सुशांतला बिझी ठेवण्यासाठी  रिया आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पार्टी ठेवायची. पण बर्‍याच वेळा सुशांत खोलीतून बाहेर यायचा नाही. ते स्वत: ला खोलीत बंद करुन घ्यायचा. 

रिया करत होती पैशांचं प्लॅनिंगजानेवारी महिन्यातील या ऑडिओ क्लिपमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत रिया चक्रवर्ती तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि मॅनेजर श्रुती मोदीसोबतच फायनॅन्शिअल अ‍ॅडव्हायजरसोबत बोलताना ऐकू येते.लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतचे पैसे मॅनेज करताना ऐकायला मिळते. ही ऑडिओ क्लिप साधारण ३६ मिनिटांची असल्याचे सांगितले जात आहे. आजतकच्या एका रिपोर्टनुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला त्याच्या पैशांची एफडी करण्यावर जोर देत आहे. रिया म्हणते की, 'मी फक्त यामुळे हे सांगतेय, समजा मी तिथे नसेल, श्रुती मोदीही नसेल, सॅम्युअल नसेल आणि सुशांत एखाद्या नव्या माणसासोबत असेल. त्याच्या हाती सुशांतच कार्ड लागलं तर? त्यामुळे मी सुशांतला एफडी बनवण्याचा सल्ला देईन. आपण पूर्ण पैसा एफडीमध्ये ठेवू. कार्डमध्ये १० ते १५ लाख रूपयांपेक्षा जास्त असू नये. याने सुशांतला त्याच्या पैशांचं व्याजही मिळेल. जेव्हा गरज असेल तेव्हा तो एफडी तोडूही शकतो'.

 स्टाफ दिपेश सावंतचे समोर 14 जूनचे 'ते' व्हॉट्सअ‍ॅप चॅट, मेसेजमध्ये सुशांतच्या नावाचा उल्लेख 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती