Join us  

चिमुरड्यांसह समीरा रेड्डीचं संपूर्ण कुटुंब अडकले कोरोनाच्या विळख्यात, असा करताहेत सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 7:12 PM

समीरा रेड्डीने इंस्टाग्रामवर सांगितले की, तिचा नवरा आणि मुलांसमवेत तिलाही कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. काही सेलिब्रेटींचे संपूर्ण कुटूंब कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहे. आता समीरा रेड्डीनेदेखील इंस्टाग्रामवर माहिती दिली की, तिचा नवरा आणि मुलांसमवेत तिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने सांगितले की 'कसे तिच्या मुलांमध्ये सर्वात आधी कोरोनाचे लक्षण दिसले.' नील नितीन मुकेश आणि आशुतोष राणाच्या फॅमिलीमधील सदस्यांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

समीरा रेड्डीने लिहिले की, कित्येक लोक मला हंस आणि नायराबद्दल विचारत आहेत तर मी इथे अपडेट देत आहे. मागील आठवड्यात हंसला खूप ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोट खराब आणि खूप थकवा आला होता. हे चार दिवसांपर्यंत होते. हे खूप असाधारण होते त्यामुळे आम्ही त्याची टेस्ट केली आणि कोव्हिड पॉझिटिव्ह आली. सुरूवातीला मी खूप घाबरली होती कारण भलेही तुम्ही कितीही तयारीत असलात तरी अशा गोष्टींसाठी कोणीही पूर्णपणे तयार नसते.

समीरा पुढे लिहिले की, काही कालावधीनंतर नायरामध्येही ही लक्षण दिसू लागली. तिला ताप होता आणि पोट खराब झाले होते. मी तातडीने उपचार म्हणून तिला औषधे दिली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल जागरूक असले पाहिजे. दुसऱ्या लाटेचा बऱ्याच मुलांवर परिणाम झाला आहे. मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की जास्त केसेसमध्ये सौम्य लक्षणं आहेत. डॉक्टर विटामीन सी, मल्टी विटामिन घेण्याचा सल्ला देत आहे. प्रोबायोटिक आणि झिंक डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच घ्या. मी त्यांना बरे वाटावे म्हणून सर्व काही केले आणि आता दोघेही उत्साही आहेत. मस्ती मोडमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत.

समीराने पुढे सांगितले की, भलेही तुमच्या मुलांमधील लक्षणे दिसणे बंद झाले असले तरी त्यांना लोकांपासून १४ दिवस लांब ठेवा जेणेकरून आजार पसरू नये. तिने सांगितले की, तिच्या सासूला कोरोना झाला नाही आणि त्या वेगळ्या राहत आहेत. मुलांनंतर समीरा आणि तिच्या नवऱ्याची कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. ती औषधे, वाफ आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या, श्वासोच्छवासाचे व्यायाम, प्राणायम यांसारख्या उपायांसोबत पौष्टिक पदार्थ खात आहे आणि डॉक्टरांच्या नियमांचे पालन करत आहे. समीराने हेही सांगितले की, तिची पॉझिटिव्हिटी तिची ताकद आहे आणि तिला पॉझिटिव्ह कॉन्टेंट देत राहते.

टॅग्स :समीरा रेड्डीकोरोना वायरस बातम्या