Join us  

हिला कोणी आवरा रे...! कंगना राणौत स्वत:ची मिमिक्री पाहून भडकली, नको ते बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 5:40 PM

होय, कंगना राणौतने पुन्हा एक ट्वीट केलेय आणि त्याचीच बातमी आहे. मात्र यावेळी कंगनाने दिलजीत दोसांज नाही तर सलौनी गौर हिला लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून कंगना सतत चर्चेत आहे. सगळ्यांसोबत पंगा घेत तिचा टिवटिवाट सुुरू आहे.

होय, कंगना राणौतने पुन्हा एक ट्वीट केलेय आणि त्याचीच बातमी आहे. मात्र यावेळी कंगनाने दिलजीत दोसांज नाही तर सलौनी गौर हिला लक्ष्य केले आहे. सलौनी गौर एक कॉमेडियन आहे. या सलौनीने कंगनाची मिमिक्री केली आणि कंगना संतापली. इतकी की, नको ते बोलली.17 डिसेंबरला सलौनीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात ती कंगनाच्या गेटअपमध्ये आहे. तिची नक्कल करत, तिने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला होता. केवळ 1 मिनिट 12 सेकंदात 5 हजारांवर लोकांनी तो रिट्वीट केला होता.

कंगनाच्या चाहते हा व्हिडीओ पाहून भडकले होते तर काहींनी सलौनीच्या या व्हिडीओचे कौतुक केले होते. कंगनापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आणि ती भडकली. मग काय, संतापाच्या भरात तिने असे काही ट्वीट केले की, सगळेच हैराण झालेत.

 

‘येथे माझ्या पॉटीसाठीही एक बाजार आहे. तुझ्या लूक्सबद्दल मी बोलत नाहीये. तुझ्या सडक्या आणि घाणेरड्या विचारांबद्दल मी बोलतेय. हे म्हणजे माझ्या मलमूत्राची नक्कल करण्यासारखे आहे. यासाठी मी तुला पूर्ण मार्क देईल. लेजेंड्सची पॉटीही विकल्या जाते,’ असे ट्वीट कंगनाने केले.कंगनाच्या ट्वीटमधील भाषा पाहून अनेकांना धक्का बसला. पण बोलणा-याला कोण आवरणार?गेल्या काही महिन्यांपासून कंगना सतत चर्चेत आहे. सगळ्यांसोबत पंगा घेत तिचा टिवटिवाट सुुरू आहे. यावरून कंगना ट्रोल होतेय, पण तिला त्याची पर्वा नाही. अलीकडे शेतकरी आंदोलनावरून कंगना व दिलजीत दोसांज यांच्या ट्वीटर वॉर रंगले होते. तेही सर्वांनी बघितलेच.

टॅग्स :कंगना राणौत