‘ऐ दिल...’चा टीजर पाहून सलमान म्हणाला, ‘She’s so beautiful.... ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 17:51 IST
नुकताच ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर लॉन्च झाला. टीजर पाहिल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी करण जोहरच्या या चित्रपटाची जोरदार प्रशंसा चालवली ...
‘ऐ दिल...’चा टीजर पाहून सलमान म्हणाला, ‘She’s so beautiful.... ’
नुकताच ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर लॉन्च झाला. टीजर पाहिल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी करण जोहरच्या या चित्रपटाची जोरदार प्रशंसा चालवली आहे. या सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे सलमान खान. होय, ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिल्यानंतर सलमानने अनपेक्षित प्रतिक्रिया नोंदवली. टीजर लॉन्च होऊनही काहीशा व्यस्ततेमुळे सलमानने तो पाहिला नव्हता. एका रिपोर्टरने सलमानला ‘ऐ दिल है मुश्किल’चा टीजर पाहिला का? असा प्रश्न केला होता. यावर नाही, मी अद्याप पाहिलेला नाही, असे सलमानने सांगितले. पण यानंतर वेळ काढून सलमानने हा टीजर पाहिला आणि लगेच टिष्ट्वटरवर स्वत:ची प्रतिक्रियाही नोंदवली. ‘She’s so beautiful.... ’असे सलमानने लिहिले. आता सलमानची ही प्रतिक्रिया कुणासाठी आहे, हे त्याने सांगितलेले नाही. कारण ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या रॉय आणि अनुष्का शर्मा अशा हिरोईन आहेत. पण सलमानच्या लेखी सुंदर कोण असणार, हे न समजण्याइतपत तुम्ही आम्ही दुधखुळे नक्कीच नाही, होय ना??