Join us  

सलमान मोहनीश बहलच्या मुलीला करणार बॉलिवूडमध्ये लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 2:53 PM

आता सलमान आपला खास मित्र मोहनीश बहलची मुलगी प्रनूतनला आगामी चित्रपटात लाँच करणार आहे. हा चित्रपट नितीन कक्कर दिग्दर्शित करणार आहे.

ठळक मुद्देसलमानच्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार प्रनुतन आणि झहीर झक्बाल ही नवी जोडी

बॉलिवूडचा दंबग खान सलमानने बऱ्याच नवोदीत कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी मिळवून दिली आहे. कतरिना, डेझी, जॅकलिन, बॉबी देओल, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान, सूरज पंचोली, आयुश शर्मा, अथिया शेट्टी अशा अनेक कलाकारांना सलमानने संधी दिली आहे. पण या व्यतिरिक्त अनेक नवोदीत कलाकारांना येत्या वर्षभरात सलमान बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. नुकतीच त्याने वरीना हौसेन, झहीर इक्बाल या दोन नवोदितांना लाँच करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता सलमान आपला खास मित्र मोहनीश बहलची मुलगी प्रनूतनला आगामी चित्रपटात लाँच करणार आहे. हा चित्रपट नितीन कक्कर दिग्दर्शित करणार आहे.

सलमान त्याचा ऑनस्क्रीन भाऊ मोहनीश बहल यांच्या मुलीला लाँच करण्याच्या विचारात आहे. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटात प्रनुतन आणि झहीर झक्बाल ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाच्या शूटिंग डेट्स फायनल करणार आहेत. मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचं नातं तसं जुनं. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ यासांरख्या चित्रपटातून सलमान मोहनीशनं एकत्र काम केलं. या दोन्ही चित्रपटांत मोहनीशनं सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.  सध्या प्रनूतनचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिची तुलना दिग्गज अभिनेत्री आणि तिची आजी नूतन यांच्यासोबत करण्यात आली होती. प्रनुतनबरोबरच सलमान बॉडीगर्ड शेराचा मुलगा टायगरलाही बॉलिवूडमध्ये आणण्याच्या विचारात आहे. याचबरोबर महेश मांजरेकरच्या मुलीला देखील येणाऱ्या काळात  सलमान बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहे. 

टॅग्स :सलमान खानमोहनिश बहल