Join us  

OMG! ‘टायगर जिंदा है’ पुन्हा रिलीज होणार; पण सलमान खान नाही दिसणार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:09 PM

होय, भाईजानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. अर्थात या चित्रपटात सलमान खान नसणार.

ठळक मुद्देतूर्तास सलमान खान ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. ‘भारत’  हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़.

भाईजान सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, भाईजानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. अर्थात या चित्रपटात सलमान खान नसणार. इतकेच काय, सलमानची ‘लकी चार्म’ कॅटरिना कैफही नसणार. होय, याचे कारण म्हणजे, हा चित्रपट तेलगू भाषेत तयार होणार आहे. म्हणजेच ‘टायगर जिंदा है’चा तेलगू रिमेक बनणार आहे. साहजिकचं, या तेलगू रिमेकमध्ये टायगरच्या रूपात सलमान नसेल.  

चर्चा खरी मानाल तर टायगरची ही भूमिका तामिळ स्टार गोपीचंद साकारणार आहे. तर कॅटरिनाची भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच ती होईल, असे कळतेय.‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम करत, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३४ कोटींची विक्रमी कमाई केली होती. आता ‘टायगर जिंदा है’चा तेलगू रिमेक बॉक्सआॅफिसवर काय विक्रम करतो ते पाहूच.

तूर्तास सलमान खान ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. ‘भारत’  हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़.  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   

टॅग्स :सलमान खानटायगर जिंदा है