ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 17:40 IST
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमान ...
ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमान खानच्या चाहत्यांसाठी ख्रिसमसची ट्रिट ठरणार आहे. ख्रिसमस पूर्वी २२ डिसेंबर २०१७ या तारखेला ‘टायगर जिंदा है’ चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान खान लवकर या चित्रपटाची शूटिंग मोरोक्को येथे सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ हा २०१२ साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी ऐजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’ च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असताना आपल्या देशासाठी काम करताना दिसणार आहे. टायगर जिंदा है या चित्रपटाची शूटिंग मरोक्कोतील माराकेश या शहरात केली जाणार आहे. या चित्रपटाची कथा तेथून सुरू होणार आहे. जेथे एक था टायगरची कथा संपली होती. या चित्रपटाची कथा आजच्या काळातीलच असेल. यात सलमान खान व कॅटरिना कैफ ‘एक था टायगर’ मधील पात्रांमध्येच पहायला मिळतील. चित्रपटातील पात्रांच्या वयात कोणताच बदल झालेला दिसणार नाही. टायगर जिंदा है मधील अॅक्शन दृष्ये हे डोळ्यांचे पारणे फे डणारी ठरणार आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून प्रेक्षकांना ही दृष्ये आश्चर्यकारक वाटणारी ठरणार आहे.Read More : ‘टायगर जिंदा है’ लोकेशन्ससाठी अली अब्बास जफर पोहोचला मोरोक्कोमध्येकॅटरिना कैफसाठी हा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. कॅटरिनाचे मागील तीन चित्रपट फ्लॉप ठरल्याने ‘टायगर जिंदा है’च्या यशामुळे तिच्या करिअरला नवी संजीवनी मिळू शकते. सलमानच्या हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला व त्याने ३०० कोटीच्यावर बॉक्स आॅफिस कमाई केली तर नवा रेकॉड त्याच्या नावे लिहला जाणार आहे. याचवर्षी सलमान खानचा कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान उशीरा होते.Read More : रणबीर कपूर देणार सलमान-कॅटरिनाला बॉक्स आॅफिसवर टक्कर!Related Articles ‘टायगर जिंदा है’साठी सलमान खानचा ‘असा’ आहे डाएटOMG ! ‘टायगर जिंदा है’चा कॉन्सेप्ट व कथा लीक!!