Join us  

सध्या कुठे आहेत,काय करतात सलमान खानच्या ‘या’ हिरोईन; दोघींचा तर पत्ताच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 11:29 AM

सलमानने अनेकांना संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलले. पण अशाही काहीजणी आहेत, ज्या सलमानसोबत झळकल्या अन् नंतर इंडस्ट्रीतून पुरत्या गायब झाल्यात.

ठळक मुद्दे सलमानच्या ‘सनम बेवफा’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री चांदनी आज ग्लॅमर दुनियेतून गायब आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानसोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्री बघते. भाईजानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले, अनेकांना संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलले. पण अशाही काहीजणी आहेत, ज्या सलमानसोबत झळकल्या अन् नंतर इंडस्ट्रीतून पुरत्या गायब झाल्यात. आज अशाच पाच अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूजा डडवाल

1995 मध्ये रिलीज ‘वीरगती’ या सिनेमात सलमान खानसोबत पूजा डडवाल झळकली होती. यानंतर तिने आणखी काही सिनेमात काम केले. पण यानंतर ती बॉलिवूडमधून अचानक गायब झाली. 2018 मध्ये पूजा डडवाल अचानक चर्चेत आली. फुफ्फुसाच्या आजाराने आणि टीबीने ग्रासलेल्या पूजाजवळ उपचारासाठी देखील पैसे नव्हते. तिची अवस्था पाहून सलमान तिच्या मदतीसाठी धावला होता.  

रंभा

एक नाही तर सात भाषेतील सिनेमात काम करणाºया रंभाने सलमानसोबत काम केले होते. 1997 साली जुडवा आणि 1998 साली बंधन या सिनेमात सलमान व रंभाची जोडी दिसली होती. रंभाने तामिळ, तेलगू, भोजपूरी, हिंदी, कन्नड, बंगाली अशा अनेक सिनेमांत काम केले. यानंतर ती छोट्या पडद्याकडेही वळली. 2017 मध्ये टीव्हीवरच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती झळकली होती. तूर्तास ती लाईमलाइटपासून दूर आहे.

चांदनी

सलमानच्या ‘सनम बेवफा’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री चांदनी आज ग्लॅमर दुनियेतून गायब आहे. तिचे खरे नाव नवोदिता शर्मा. काही सिनेमे केल्यानंतर चांदनीने बॉलिवूडला रामराम ठोकला. 1999 साली रिलीज ‘हाहाकार’ तिचा अखेरचा सिनेमा ठरला. लग्नानंतर चांदनी विदेशात स्थायिक झाली. येथे ती डान्स शिकवते.

रेनू आर्या

बीवी हो तो ऐसी या सिनेमात सलमान खानसोबत रेनू आर्या ही अभिनेत्री झळकली होती. हा सिनेमा सलमानचा डेब्यू सिनेमा होता. एक दोन सिनेमे केल्यानंतर या सिनेमातील सलमानची हिरोईन रेनू अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. इतक्या वर्षांनंतरही तिचा काही पत्ता नाही. ती कुठे आहे, काय करते कोणालाही ठाऊक नाही.

कंचन

सनम बेवफा या सिनेमात सलमानसोब चांदनी शिवाय आणखी एक अभिनेत्री होती. तिचे नाव कंचन. या कंचनने हिंदीशिवाय साऊथच्या सिनेमातही काम केले. अक्षय कुमारच्या ‘अमानत’ आणि गोविंदाच्या ‘कुली नंबर 1’ या सिनेमातही तिने काम केले. मात्र अचानक यानंतर तिने सिनेमात काम करणे बंद केले. कंचन सध्या कुठे आहे, काय करते कोणालाहीठाऊकनाही.

टॅग्स :सलमान खान