Join us

तर बॉलिवूडमध्ये सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस लाँच करणार नव्या अभिनेत्रीला..वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 12:24 IST

भाईजान अर्थात सलमान खानने आजपर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. सलमानचे एस.के.एफ. नावाच्या प्रोडक्शन अंतर्गत अनेक चेहऱ्य़ांना ...

भाईजान अर्थात सलमान खानने आजपर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. सलमानचे एस.के.एफ. नावाच्या प्रोडक्शन अंतर्गत अनेक चेहऱ्य़ांना बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी देण्यात आली आहे. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टाला सलमाननेच लाँच केले आहे. यानंतर पुन्हा एकदा तो एका नव्या चेहऱ्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलात सलमान एका नव्या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, त्यांना एका 20-25 वर्षांच्या वयातील एक मुलीचा शोध घेतायेत. जिला सलमान खान प्रोडक्शनकडून लाँच करण्यात येईल.   काही रिपोर्टनुसार मुकेश छाबडा या नव्या मुलीचा शोध आयुष शर्माच्या अपोझिट डेब्यूसाठी घेतायेत. बहिण अर्पिता खानाचा नवरा आयुष शर्माला सलमान खान लाँच करतोय हे सगळ्यांच माहिती आहे. डिएनएच्या रिपोर्टनुसार आयुषच्या डेब्यूसाठी सलमानला योग्य स्क्रिप्ट देखील मिळाली आहे. ज्यात अॅक्शन, रोमांस आणि इमोशन या तिन्ही गोष्टी आहेत. आयुषने या चित्रपटाची तयारी सुद्धा सुरू केली आहे. सलमान सध्या या चित्रपटाचे योग्य दिग्दर्शकाच्या शोधात आहे. चित्रपटाची शूटिंग याच वर्षी सुरू होईल आणि 2018मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ALSO READ : ऐका सलमान खान काय सांगतोय त्याच्या शेजाऱ्यांविषयीयाआधी आयुष करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. आयुषच्या आधी हा चित्रपट पाकिस्तानी अभिनेता फवाद खान करणार होतो. सूत्रांच्या माहितीनुसार करण आणि सलमानमधल्या  क्रिएटिव्ह डिफरेंसेजमुळे चित्रपट होल्डवर ठेवण्यात आला आहे. ज्यानंतर सलमानने आयुषाला लाँच करण्याचा निर्णय घेतला.