Join us  

'भारत'मध्ये असा असणार सलमान खानचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 7:54 AM

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानने आपला आगामी चित्रपट 'रेस 3'ची शूटिंग पूर्ण केली आहे. ज्यानंतर तो त्याचा पुढचा चित्रपट ...

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानने आपला आगामी चित्रपट 'रेस 3'ची शूटिंग पूर्ण केली आहे. ज्यानंतर तो त्याचा पुढचा चित्रपट भारतच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करणार आहे. सलमान खान आणि अलीच्या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे.याआधी या जोडीने बॉलिवूडला सुल्तान आणि 'टायगर जिंदा है' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दक्षिण कोरियाचा चित्रपट 'ओडी ट माइ फादर' चा भारत हा हिंदी रिमेक आहे.   'भारत' या चित्रपटाची शूटिंग सुरु झाल्याची माहिती अली अब्बासने ट्विटरवरुन दिली आहे. भारतच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे. खूप सगळ्या एक्सायटिंग गोष्टी तुम्हाला लवकरच कळतील. याआधी सलमान खानसोबत करीना कपूर दिसणार असल्याची चर्चा होती मात्र प्रियांका चोप्रा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. रसिकांना दोघांची केमिस्ट्री 'मुझसे शादी करोगे' या चित्रपटात देखील आवडली होती. प्रियांकाने याआधी अली अब्बास जफरसोबत 'गुंडे' चित्रपटात काम केले आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. मध्यंतरी प्रियांका ‘ऐतराज’च्या सीक्वलमधून बॉलिवूडमध्ये परतणार अशी बातमी होती.१४ वर्षांपूर्वी आलेल्या सुभाष घई निर्मित ‘ऐतराज’या थ्रीलर चित्रपटाला अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केले होते. ALSO READ :   It's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’! सलमान खानसोबत जमणार जोडी!!सलमानसोबत रेस 3 मध्ये जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल आणि अनिल कपूर दिसणार आहेत. ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.