Join us  

ज्या व्यक्तीवर मी इतका विश्वास ठेवला त्यानेच माझा घात केला, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:03 PM

सुनील शेट्टी, मिथुन चक्रवर्ती आणि ओम पुरी या दिग्गजांसोबत काम केलेल्याच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपल्या अभिनयासोबतच अभिनेत्रींसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असतो. सोमी अलीसह तो नात्यात असल्याचे बोलले जाते. बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. खरं तर मला अभिनयात बिलकुल रस नव्हता. केवळ सलमानला भेटता यावे म्हणून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि योगायोगाने तिला संधीही मिळाली. काही सिनेमात काम केल्यानंत अचानक सिनेसृष्टीपासून दूर गेलेली सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खानबाबतच्या तिच्या नात्याविषयी मौन सोडले आहे.

आयुष्या काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात हे शंबर टक्के खरंय,  जे होतं ते सांगल्यासाठी पुन्हा  मागे वळून पाहायचे नाही. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा मला काहीच माहित नव्हते.मार्गदर्शन करायला कोणीही नव्हते. मी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. आणि तिथेच माझ्या विश्वासाचा घात झाला. ज्या व्यक्तीवर मी सर्वाधिक विश्वास  ठेवला त्यानेच माझा विश्वास घात केल्याचे सोमी अलीने म्हटले आहे. माझ्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींना मी भेटले त्या गोष्टींचा अजिबात पश्चाताप नाही.

केवळ एका गोष्टीमुळे मी अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता.  मला माहिती आहे की, माझ्या छोट्याशा कारकीर्दीत मी खूप चांगल्या लोकांसह काम केले. जर थांबले असते तर आणखी चांगले काही तरी करु शकले असते. सुनील शेट्टी, मिथुन चक्रवर्ती आणि ओम पुरी या दिग्गजांसोबत काम केलेल्याच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.  मात्र जेव्हा खराब रिलेशिपमध्ये मी अडकले तेव्हा काही लोकांनी मला आधार दिला. भारतात माझ्यासाठी कटु गोड आठवणी आहेत.

मला यावेळी सलमानच्या आईचाही उल्लेख करायला आवडेल, मला फारसे जास्त कोणाविषयी आठवत नाही.मात्र सलमानची आईला मी खूप जास्त पसंत करायचीय. मी जेव्हा काही चुकीचा पाऊल उचलायची तेव्हा सलमानची आईनेच मला योग्य मार्गदर्शन केले आणि मला सावरले. आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या अनुभवांमुळेच आहे. त्यातून एक व्यक्ती म्हणून मी अधिक चांगले घडु शकले.

चित्रपट कारकीर्दीपासून दूर जाणे हा तिच्यासाठी सर्वोत्तम निर्णय होता, असं सोमीला वाटतं. "मला वाटते की मी माझ्या आयुष्यात केलेली सर्वात चांगली गोष्ट होती. मला खरंच खूप त्रास होत होता आणि मला माहित होतं की मी येथेच राहिले तर याचा माझ्या मानसिक आणि आरोग्यावर खरोखरच मोठा परिणाम होईल, म्हणून माझ्यासाठी येथून निघून जाणे हा चांगलाच निर्णय असल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :सलमान खानसोमी अली