Join us  

तर त्याने माझ्या वडिलांचेही नाव घेतले असते!  अभिनव कश्यपवर भडकले सलमान खानचे वडील सलीम खान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 1:47 PM

अभिनवच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी यावर उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देजे लोक आपली मनमनी करून कलाकारांनी असे वर्तन करतात. त्यांचा पदार्फाश करणे गरजेचे आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान, असे अभिनवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला असताना दिग्दर्शक अभिनव कश्यपने  त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवली होती.  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी करत सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर अभिनव कश्यपने गंभीर आरोप केले होते. सलमान खान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असे तो म्हणाला होता. त्याच्या या आरोपांनी खळबळ माजली असताना आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी यावर जळजळीत शब्दांत उत्तर दिले आहे.बॉम्बेटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीम यांना अभिनवच्या पोस्टबद्दल विचारण्यात आले. यावर सलीम यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले सलीम खानअभिनवच्या आरोपांना उत्तर देताना सलीम खान म्हणाले, ‘हो आम्हीच सगळ्यांचे करिअर संपवले. आधी त्याचे सिनेमे पाहा, मग बोला. त्याने माझेही नाव घेतले. कदाचित त्याला माझ्या वडिलांचे नाव माहित नाही़ नाही तर त्याने त्यांचेही नाव घेतले असते. माझ्या वडिलांचे नाव राशीद खान आहे. त्याने त्यांचेही नाव घ्यावे. माझे आजोबा, पणजोबांचेही नाव घ्यावे. त्याला बोलू द्या. त्याच्याबद्दल बोलून मी माझा वेळ व्यर्थ करू इच्छित नाही.’

काय होते अभिनवचे आरोप

 ‘दबंग मेकिंगच्या वेळी मला अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी फक्त मला घाबरवले, धमकावले नाही तर त्यांनी माझे करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला होता. अरबाने माझा ‘दबंग’ नंतर दुस-या सिनेमाचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या फॅमिली पावरचा वापर करून माझ्याकडून काढून घेतला होता. ज्यामुळे माझे खूप नुकसान झाले होते. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली. माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती.  जे लोक आपली मनमनी करून कलाकारांनी असे वर्तन करतात. त्यांचा पदार्फाश करणे गरजेचे आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान, असे अभिनवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.  

टॅग्स :सलमान खानसलीम खान