Join us  

PICS : अन् सलमान खानच्या ‘एक्स-बॉडीगार्ड’ला पोलिसांनी दोरखंडाने बांधले, बातमी वाचून बसेल धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:47 PM

सलमान खान कायम चर्चेत असतो. सध्या सलमान चर्चेत आहे, तो त्याच्या माजी अंगरक्षकामुळे. होय, त्याच्या जुन्या बॉडीगार्डमुळे. अनस कुरेशी त्याचे नाव.

ठळक मुद्देअनसने मिस्टर मुरादाबाद स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तो रनरअप होता.

सलमान खान कायम चर्चेत असतो. सध्या सलमान चर्चेत आहे, तो त्याच्या माजी अंगरक्षकामुळे. होय, त्याच्या जुन्या बॉडीगार्डमुळे. अनस कुरेशी त्याचे नाव. काही वर्षांपूर्वी अनस सलमानच्या बॉडीगार्डच्या टीमध्ये होता. सलमानचा खास बॉडीगार्ड शेराच्या टीममध्ये  काम करायचा. त्याआधी मुंबईमध्ये बाऊन्सर म्हणून तो काम करायचा. पण आज याच अनसला पकडण्यासाठी दोरखंडाचा वापर करावा लागला.होय, अनसची कथा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कधीकाळी सलमानच्या बॉडीगार्ड म्हणून मिरवणा-या अनसचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याच अवस्थेत अलीकडे त्याने मुरादाबाद शहरात लोकांवर हल्ला केला. रस्त्यावरच्या वाटसरूंवर आणि वाहनांवर त्याने दगडफेक सुरु केली. लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो इतका बिथरला होता की, त्याने सगळ्यांच्याच नाकीनऊ आणले.

अखेर पोलिस आले. त्यांनीही अनसला नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचेही प्रयत्न फसले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दोरखंड आणि मासे पकडण्याच्या जाळ्याच्या मदतीने अनसला पकडण्यात आले.

 

बलदंड शरीराच्या अनसवर ही वेळ आली ती, स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे. होय, या औषधांच्या अतिसेवनाने त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तुर्तास त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतरच त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे.अनसने मिस्टर मुरादाबाद स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तो रनरअप होता. 2017 मध्ये अनसवर एका महिला नातेवाईकाने बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणात तो तुरुंगातही गेला होता. यानंतर तो जामिनावर बाहेर आला. 

टॅग्स :सलमान खान