Join us

​सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा कॅटरिना कैफच्या दिमतीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 14:41 IST

सलमान खानची काल परवाची प्री-दिवाळी पार्टी  चांगलीच गाजली. या पार्टीत  अनेक गोष्टी घडल्या. आता यापैकी काही इंटरेस्टिंग गोष्टी  तुम्हाला ...

सलमान खानची काल परवाची प्री-दिवाळी पार्टी  चांगलीच गाजली. या पार्टीत  अनेक गोष्टी घडल्या. आता यापैकी काही इंटरेस्टिंग गोष्टी  तुम्हाला कळायलाच हव्यात ना?  गत शुक्रवारी सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या घरी  ही प्री-दिवाळी पार्टी रंगली. सलमान या पार्टीचा होस्ट होता.  बॉलिवूडमधील बहुतेक सगळे दिग्गज या पार्टीत हजर होते.  ब्युटिफुल कॅटरिना कैफ ही सुद्धा पार्टीला हजर होती. सलमानची एकेकाळची गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ पार्टीत आली अन् सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. कॅमे-यांची क्लिक क्लिक झाली. कॅटरिना आत गेली अन् पार्टीला नवाच रंग चढला. खरे तर सलमान या पार्टीत सगळ्या पाहुण्यांकडे जातीने लक्ष देत होता. पण कॅटरिनाकडे मात्र त्याचे खास लक्ष होते. त्याचे ध्यान एक क्षणही तिच्यावरून हटले नाही. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला हे कसे माहित तर, या बातमीसोबतचा हा एक फोटो तुम्ही बघायलाच हवा. या फोटोत कॅट दिसतेय आणि तिच्या मागे सलमानचा बॉडिगार्ड शेरा उभा आहे. आता ही काय भानगड आहे, तर तेही ऐका.अर्पिताच्या घरची पार्टी अखेरच्या टप्प्यात आली असताना सगळे स्टार्स आपआपल्या घराच्या दिशेने निघू लागले. कॅटरिनाही निघाली. पण सलमान...? त्याला मात्र कुणाची नाही पण कॅटरिनाची जरा जास्तच काळजी वाटू लागली आणि त्याने लगेच त्याचा पाठीराखा म्हणजे बॉडीगार्ड शेराला कॅटच्या मागे पाठवले. कॅटला गाडीपर्यंत सोडून ये, असे फर्मान सलमानने सोडले आणि शेरा कॅटच्या मागे निघाला. त्याने अतिशय अदबीने कॅटला गाडीपर्यंत सोडून दिले. ALSO READ: ​सलमान खान व कॅटरिना कैफ आपल्या जुन्या रिलेशनशिपला देणार का दुसरी संधी?बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरची पार्टी असली की, मीडियासोबतच  चाहतेही त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसतात. अशात सलमानची बात म्हटल्यावर चाहत्यांची गर्दी ही आलीच. त्यामुळे सलमानला चिंता वाटणेही साहजिकच आले.  चाहत्यांनी कॅटरिना घेरू नये, तिला कुठलाही त्रास होऊ नये, असे सलमानला वाटले. असे नसतेच तर सलमानने स्वत:चा बॉडीगार्ड कॅटरिनाच्या दिमतीला दिला नसताच.  सलमान व कॅटरिनाचे ब्रेकअप झाले असले तरीही त्यांच्यातील एक नाजूक धागा अद्यापही कायम आहे. तो अद्यापही तुटलेला नाही, असेच यावरून दिसते.