Join us

'भारत'मध्ये एका नाही तर पाच भूमिकांमध्ये दिसणार सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 11:38 IST

टायगर जिंदा हैच्या यशानंतर सलमानने लगेच त्याचा आगामी चित्रपट रेस3 च्या शूटिंगला सुरुवात देखील केली आहे. यानंतर लवकरच सलमान ...

टायगर जिंदा हैच्या यशानंतर सलमानने लगेच त्याचा आगामी चित्रपट रेस3 च्या शूटिंगला सुरुवात देखील केली आहे. यानंतर लवकरच सलमान आपला पुढचा प्रोजेक्ट 'भारत'च्या कामाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे.    मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार भारत चित्रपटात सलमान खान पाच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यासाठी तो प्रोस्थेटिक आणि वीएएक्सची मदत घेणार आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा चित्रपट रखडत चालला होता. सर्वप्रथम हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुल व सलमानला वाटत होते. अली अब्बास या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफला घेण्याचा विचार करतो आहे.  रिपोर्ट नुसार अली अब्बास जफरने म्हटले आहे की, भारत एक सुंदर गोष्ट आहे जी सलमान खानच्या डोळ्यातून दिसेल. कारण यात आम्ही 70 विविध दशकांना दाखवणार आहे. त्यामुळे आम्ही सलमानला 5 लूक दाखवण्याचा विचार करतो आहे. त्याचा प्रत्येक अवतार हा एक गोष्ट सांगणारा आहे. या चित्रपटाची शूटिंग जून महिन्यापासून सुरु केली जाणार आहे. मात्र त्याची तयारी फेब्रुवारी महिन्यापासून होणार आहे.   ALSO READ :  तीन मुलांच्या आईसोबत रोमान्स करताना दिसणार ‘दबंग’ सलमान खान !सलमान खानाचा 'रेस 3' मध्ये जॅकलिन आणि डेजी शहा ही दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरणी करतायेत तर दिग्दर्शन रेमो डिसुझा करतो आहे. हा चित्रपट 2018 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खानचे फॅन्स या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत. या चित्रपटाची शूटिंग मुंबईतल्या गोरेगावमध्ये सुरू आहे. अनिल कपूर यात डिटेक्टि आरडी च्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी सलमान आणि अनिल कपूरने बीवी नंबर 1, नो एंट्री, युवराज आणि सलाम-ए-इश्क या चित्रपट एकत्र झळकले होते. 'रेस'च्या सिरिजचे चित्रपट आतापर्यंत सगळे हिट गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून ही प्रेक्षकांना अनेक अपेक्षा आहेत.