Join us  

​मैंने प्यार किया या चित्रपटासाठी सलमान खान नव्हे तर हा अभिनेता होता सुरज बडजात्याची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 6:44 AM

मैंने प्यार किया या चित्रपटामुळे सलमान खान सुपरस्टार झाला. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. पण सलमान ...

मैंने प्यार किया या चित्रपटामुळे सलमान खान सुपरस्टार झाला. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. पण सलमान खान हा सुरज बडजात्याची या भूमिकेसाठी पहिली चॉईस नव्हता. या चित्रपटासाठी ज्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती, तो अभिनेता आज बॉलिवूडच्या या झगझगत्या दुनियेपासून खूप दूर आहे.मैंने प्यार किया या चित्रपटाच्या आधी सलमान खानने बीवी हो तो ऐसी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती. पण मैंने प्यार किया या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली आणि याच चित्रपटामुळे सलमानच्या करियरला सुरुवात झाली. सलमान खानच्या आधी मैंने प्यार किया या चित्रपटातील प्रेम या भूमिकेसाठी फराज खानची निवड करण्यात आली होती. फराज खान हा अभिनेता युसूफ खान यांचा मुलगा आहे. युसूफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. युसूफ यांनी अमर अकबर एन्थॉनी या चित्रपटात साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. युसूफ यांचे 1984 साली हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सुरज बडजात्या यांनी मैंने प्यार किया या चित्रपटासाठी अनेक नवीन चेहऱ्यांचे ऑडिशन घेतले होते आणि यातून फराजची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी फराजला साइन करण्यात आले आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीखदेखील ठरली. पण ऐनवेळी फराज खूप आजारी पडला. चित्रीकरण करणे त्याला शक्यच नव्हते. त्यामुळे सुरज बडजात्या प्रचंड टेन्शनमध्ये आले होते. फराज प्रेम या भूमिकेसाठी योग्य आहे या मतावरच सुरज ठाम होते. पण फराजची तब्येत सुधारत नसल्याने त्यांनी दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना काहीजणांनी सलीम खान यांच्या मुलाचे म्हणजेच सलमान खानचे नाव सुचवले. त्यावेळात सलमानदेखील चित्रपटांच्या शोधात होता. सुरज यांना सलमान प्रेम या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. फराज खानने मैंने प्यार किया या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी फरेब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तो पृथ्वी, मेहंदी, दुल्हन बनू मैं तेरी यांसारख्या चित्रपटात झळकला. पण त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. Must Read : तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?