Join us  

सलमान आहे नवीन कलाकारांसाठी अनलकी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 9:00 PM

सलमान खानची निर्मिती असलेला नोटबुक हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात प्रनुतन बहल, झहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

ठळक मुद्देसलमानने आजवर निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये कोणत्याच चित्रपटांना 50 कोटीहून अधिक कमाई कधीच करता आलेली नाही.

सलमान खान हा बॉलिवूडमधील दबंग खान असून त्याचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. त्याच्या आजवरच्या अनेक चित्रपटांनी 200 कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे. सलमानचे चित्रपट म्हटले की, ते चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करणार असे म्हटले जाते. सलमान अभिनय करत असलेले चित्रपट जरी हिट होत असले तरी सलमान ज्या चित्रपटांची निर्मिती करतोय, त्या चित्रपटाला यश मिळतेच असे नाही.

सलमान खानची निर्मिती असलेला नोटबुक हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात प्रनुतन बहल, झहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या दोघांचा अभिनय तसेच या चित्रपटाची कथा चांगली असल्याचे अनेक समीक्षकांनी म्हटले होते. पण या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. या चित्रपटाला आतापर्यंत केवळ तीन कोटी कमावता आले आहेत. 

याआधी देखील सलमान खानने लव्ह यात्री, हिरो या चित्रपटांद्वारे नवीन चेहऱ्यांना लाँच केले होते. लव्ह यात्री या चित्रपटात वरिना हुसैन आणि आयुष शर्मा ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण हा चित्रपट प्रेक्षकांना न भावल्याने या चित्रपटाला केवळ सात करोड रुपये कमावता होते तर हिरो या चित्रपटाला देखील 33 कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करता आले. 

सलमानने आजवर निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये कोणत्याच चित्रपटांना 50 कोटीहून अधिक कमाई कधीच करता आलेली नाही. त्या उलट सलमानच्या सोबत नायिका म्हणून एखाद्या अभिनेत्रीला लाँच केल्यास तिला बॉलिवूडमध्ये यश मिळाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. 

सलमान प्रमाणेच करण जोहरने देखील आजवर अनेकजणांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांना त्याने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे लाँच केले आहे आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन देखील करता आले. 

या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सलमानने लाँच केलेल्या कोणत्याच कलाकाराला अद्याप तरी बॉलिवूडमध्ये त्याचे प्रस्थ निर्माण करता आलेले नाही.

टॅग्स :सलमान खाननोटबुक