बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाºयांच्या यादीत सलमान तिसºया क्रमांकावर आहे. अशा या मेगास्टारची जर तुम्हाला झलक बघायला मिळाली तर? असाच काहीसा अनुभव सलमानच्या एका चाहतीला घेता आला. सलमानला भेटावे असे दिवसा स्वप्न बघणाºया या चाहतीसमोर अचानकच दस्तुरखुद्द सलमान उभा राहिला अन् तिच्यासाठी त्याने चक्क गाणेही गायिले. त्यामुळे ही चाहती एवढी भावुक झाली होती की, तिला स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत.
बॉलिवूड नाऊच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये सलमान त्याच्या एका चाहतीसाठी गाणे गाताना दिसत आहे. सलमानने त्याच्या या क्यूट फ्रेंडसाठी ‘मै हूं हीरो तेरा’ हे गाणे गायिले. त्यामुळे ती एवढी भावुक झाली की तिला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. पुढे या चाहतीने सलमानला मिठी मारली. सलमानने हसत हसत तिला जवळ केले.